Good News : आकाशवाणी पुणे केंद्र सुरू रहाणार!

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर आकाशवाणी (Akashvani) पुणे केंद्रातील वृत्त विभाग बंद करण्याचा निर्णय प्रसारभारतीने मागे घेतला आहे. त्यामुळे या केंद्रावरुनच यापुढे बातमीपत्रे प्रसारित होणार असल्याचे आदेश प्रसारभारतीने बुधवारी जारी केले आहेत. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री शिंदे यांनी केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांचे आभार मानले आहेत.


पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग १९ जूनपासून बंद करण्याचे आदेश प्रसारभारतीने काढले होते. या आदेशाविरुद्ध सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताच त्यांनी त्यांच्या अपर मुख्य सचिवांना सूचना देऊन केंद्रातील अधिकाऱ्यांकडे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरू ठेवावा, अशी विनंती करण्याच्या सूचना दिल्या होत्या.


त्यामागणीवर सकारात्मक निर्णय घेत प्रसारभारतीने यापुढे पुणे प्रादेशिक वृत्त विभागातूनच बातमीपत्र प्रसारित होतील, असे आदेश आज काढले आहेत. सकाळी ७.१०, ८ वा. ८.३०, १०.५८, ११.५८ आणि सायंकाळी ६ वाजताचे बातमीपत्र यापुढेही पुणे केंद्रावरुनच प्रसारित होणार आहेत.

Comments
Add Comment

Pune Press Club : पुणे प्रेस क्लबसाठी सेनापती बापट मार्गावर प्रशस्त जागा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय!

* महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुढाकार * आठ हजार चौ.फुटावर सुसज्ज इमारत उभारणार नागपूर : पुणे पत्रकार

मिलिंद साठे राज्याचे नवे महाधिवक्ता, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नागपूर : राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर नवे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांच्या

Baba Aadhav | ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढावांची प्रकृती गंभीर, रुग्णालयात दाखल

पुणे : श्रमिकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे ज्येष्ठ समाजसेवक आणि कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांची प्रकृती

'इंडिगो'वर कारवाई होणारच; मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विधान

पुणे : इंडिगो एअरलाईन्सने घातलेल्या गोंधळामुळे प्रवाशांना तब्बल सहा दिवसांपासून तिष्ठत ठेवले आहे. विमानतळावर

‘बिबट्या कसा पकडायचा?’ ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचा पुण्यात मास्टरक्लास

पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मानव-बिबटयामधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. मोकाट फिरण्याऱ्या बिबट्याचा शोध

रुद्राणी घोडी १ कोटी १७ लाख रुपयांत

नंदुरबार : नंदुरबारमधील सारंगखेड्याच्या घोडेबाजारात एक से बढकर एक घोडे दाखल होत आहे. त्यातच उत्तर प्रदेशच्या