देव हा अनुभवण्याचा विषय

  141

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


सर्व ठिकाणी देव भरलेला आहे हे बरोबर आहे, पण सर्व ठिकाणी Life आहे, सर्व ठिकाणी जंतू आहेत. खरे सांगायचे, तर या जगात किती जंतू आहेत? अब्जावधीपेक्षा कितीतरी जास्त जंतू या जगात आहेत. जगांत किती जंतू आहेत याची कल्पना जरी केली तरी सर्व जगच जंतूंनी भरलेले आहे, हे आपल्या लक्षात येईल. सर्व ठिकाणी जीव आहे व हा जीव ब्रह्म आहे. "जीवो एवं ब्रह्म इति वेदांत डिंडिमा". जीव ब्रह्म आहे, देव आहे. जीव आत्मा आहे, परमात्मा आहे. सगळे काही जीवच आहे.


"ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा" इथे लक्षात घ्या की, देव अत्यंत उपलब्ध आहे, म्हणजे तो सर्व ठिकाणी आहे. तो अत्यंत उपयुक्त आहे व तो अत्यंत सूक्ष्म आहे. काही लोक असा म्हणतात की, जिथे हवा आपल्याला दिसत नाही, आकाश आपल्याला दिसत नाही, तर देव कसा दिसणार? आपले मन आपल्याला दिसत नाही तिथे देव आपल्याला कसा दिसणार? हे लोक विचारच करत नाहीत. देव अत्यंत सूक्ष्म आहे व तो डोळ्यांनी पाहण्याचा विषयच नाही. लोकांना हे माहीत नाही. हवा डोळ्यांना दिसत नाही, तिला स्पर्श करता येत नाही. पाचही ज्ञानेंद्रियांनी तिचा अनुभव घेता येईलच असे नाही, तरी हवा आहे. पाण्यात बुडणार माणूस हवा मिळत नाही म्हणून कासावीस होतो. गुरुत्वाकर्षण शक्ती आहे की नाही? डोळ्यांना दिसते का? नाही. कानांना ऐकू येते का? नाही. ज्ञानेंद्रियांना सहज अनुभवाला येते का? नाही. तरी ती आहे, म्हणून जग चाललेले आहे.


"चाले हे शरीर कोणाचिये सत्ते" गुरुत्वाकर्षण शक्ती नसेल, तर जग चालणार नाही. हवा, प्रकाश, पाणी अथवा पृथ्वी तत्त्व नसेल, तर हे जग चालणार नाही. हे सगळे पाहिजे. सगळीच पंचमहाभुते पाहिजेच. तुम्हाला एक लक्षात येईल की हे सगळे दिव्य आहे. देव हा शब्दसुद्धा दिव्यापासूनच आलेला आहे. जगांत सर्व जे आहे ते दिव्य आहे. हे जे दिव्य तत्त्व आहे त्या ठिकाणी दिव्य शक्ती, दिव्य आनंद, दिव्य जाणीव, दिव्य ज्ञान, दिव्य प्रतिभा आहे. त्याला पाहता येत नाही, तो दिसणार नाही कारण तो पाहण्याचा विषयच नाही. मी या आधीही उदाहरण दिलेले आहे की, ज्याला गुरुत्वाकर्षण शक्तीचा अनुभव घ्यायचा असेल, त्याने चौथ्या मजल्यावरून उडी मारावी. एवढे करण्यापेक्षा एखादी गोष्ट वरून खाली टाकली तरी ती खालीच पडेल, याला कारण गुरुत्वाकर्षण शक्ती. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध न्यूटनने असाच लावला.


पूर्वी ती होतीच म्हणून त्याला Invention नाही, तर Discovery म्हणतात. पूर्वी ती होतीच, मात्र नंतर ती कळली. मी नेहमी सांगतो की, गुरुत्वाकर्षण शक्ती is next to God. इतकी महत्त्वाची आहे की, जग हे त्यामुळेच सुरळीत आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती कोणाची सत्ता? देवाची सत्ता. "चाले हे शरीर कोणाचिये सत्ते" किंवा "तुझिया सत्तेने वेदांसी बोलणे" म्हणजेच देवाची सत्ता.

Comments
Add Comment

ब्रह्मर्षी अत्री

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी प्रजापतीने सृष्टीची निर्मिती केली तेव्हा त्याला वाटले, आपण निर्माण केलेल्या या

Horoscope: जुलैच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार या राशींचे अच्छे दिन, होणार प्रचंड धनलाभ

मुंबई: ३० जूनपासून नव्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. हा आठवडा ३० जून ते ६ जुलैपर्यंत असणार आहे. ज्योतिष

Vastu shastra: ही कामे तुम्हाला बनवू शकतात कंगाल, कधीच करू नका

मुंबई: वास्तुशास्त्रानुसार व्यक्तीच्या कर्मावर त्याला त्याचे फळ मिळत असते. काही कामे केल्याने नकारात्मक ऊर्जा

शरीर साक्षात परमेश्वर

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै अनंत कोटी ब्रह्मांड, अनंत रूपे अनंत वेषे अशी परमेश्वराची रूपे आहेत. अनंत कोटी

मंत्र वारीचा

ऋतुराज : ऋतुजा केळकर मंत्र वारीचा संतांच्या पायधूळीतून भिजतो मातीचा जीव... शब्दांच्या ओवाळणीतून गुंफतो भावाचा

स्वामी विवेकानंद : एक थोर युगपुरुष

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य ज्यांच्या विचारांनी सतत नवी ऊर्जा मिळते असे युवकांचे प्रेरणास्थान व आपल्या