नागपूर: काटोलचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते आशिष देशमुख या रविवारी १८ तारखेला भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडणार आहे.
कोराडी येथील नैवेद्यम सभागृहात रविवारी सकाळी १० वाजता हा सोहळा होईल. देशमुख यांना अलीकडेच काँग्रसने सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी देशातील ओबीसी समाजाची माफी मागावी असा सल्ला त्यांनी दिला होता. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तत्पूर्वी ते काटोल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचेच आमदार होते. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे दक्षिण-पश्चिममध्ये काँग्रेसला पुन्हा नवा उमेदवार शोधावा लागणार आहे.
आशिष देशमुख यांनी ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांच्या वाढदिवसाच्या सावनेरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सुनील केदार विरोधक आणि भाजप पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तेव्हाच ते भाजपमध्ये जाणार असल्याचा तर्क लावले जात होते. दोन दिवसानंतर ते देवेंद्र फडणवीस त्यांच्या घरी चहापानाला गेले होते. तत्पूर्वी त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेटसुद्धा घेतली होती.