एकाचेच बहुत होती। तीच पुण्याची आहे स्थिती।

Share

गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला

त्रैलोक्य हाच श्री गजाननांचा मठ असून सर्व वने हा त्यांचा बगीचा आहे. अवघी पृथ्वी हाच त्यांचा पलंग आहे. श्री गजानन महाराजांचे वैभव निराळेच आहे. म्हणून पुण्य संचय करा। कुतर्क ना चित्ती धरा।

रकारकडून एक एकर जागा मिळाली. पुढे महाराजांच्या शिष्य मंडळींपैकी बंकटलाल, हरी पाटील, विठू जगदेव आदी शिष्य वर्गणी गोळा करावयास निघाले. भाविक भक्तांनी वार्गणी दिली. पण जे कुत्सित होते ते कुटाळी करू लागले. ते बोलले “तुम्ही महाराजांना महासंत म्हणता, मग त्यांचा मठ बांधावयास वर्गणी ती कशाला? कुबेर त्यांचा भांडारी आहे, त्याच्याकडे चिठ्ठी पाठवा, म्हणजे काम झाले. दारोदारी वर्गणी मागत फिरण्याची आवश्यकताच नाही.” असे बोलणे ऐकून जगदेव नावाचा महाराजांचा शिष्य त्या मंडळींना हसून म्हणाला, “ही जी वर्गणीची भिक्षा मागत आम्ही फिरतो आहोत, ते तुमच्या भल्यासाठी. महाराजांना मठ, मठी हे काही नको. हे जे काही चाललेय ते तुमच्या कल्याणासाठी. त्रैलोक्य हाच श्री गजाननांचा मठ असून सर्व वने हा त्यांचा बगीचा आहे. अवघी पृथ्वी हाच त्यांचा पलंग आहे. अहो अष्टसिद्धी ज्याच्या घरी राबतात तो कशाला तुमची पर्वा करील? श्री गजानन महाराजांचे वैभव निराळेच आहे”. मानवाला जी ऐहिक वैभवाची इच्छा असते, ती या मठाच्या निमित्ताने पूर्ण होत आहे.
म्हणून पुण्य संचय करा।
कुतर्क ना चित्ती धरा।
पुण्य मेदिनिमाजी पेरा।
करा आपुल्या संपत्तीचा।।२३।।
म्हणून या महान कार्यास हातभार लावून थोडेफार पुण्य अर्जित करा.

याकरिता दासगणू महाराज यांनी ‘एक दाणा व कणीस’ याचा सुंदर दृष्टांत दिला आहे-
संतसेवे समान।
कोणते नाही पुण्य आन।
स्वामी सांप्रत गजानन।
मुगुटमणी संतांचे।।२६।।
संतकार्यास काही देता।
अगणित होते सर्वथा।
एक दाणा टाकीत।
मेदिनीमाजी कणीस होते।।२७।।
त्या कणसास दाणे येती।
एकाचेच बहुत होती।
तीच पुण्याची आहे स्थिती।
हे बुध हो विसरू नका।।२८।।

जगदेव याने हे खरे तत्त्व सांगताच जे कुटाळ होते, ते निरुत्तर झाले आणि मुख्य म्हणजे नेता जर वजनदार असेल, तर वर्गणी पुष्कळ जमते. मंदिराचे बांधकाम सुरू होण्यापूर्वी मिळालेल्या जागेवर आधी कोट बांधला जात होता. हे बांधकाम सुरू असताना महाराज जुन्या मठावर होते. त्यांनी विचार केला की, आपण तिथे गेल्याशिवाय काम झपाट्याने होणार नाही. एक दिवस महाराज रेतीच्या गाडीवर नवीन बांधकामाच्या ठिकाणी येण्यास बसले. जसे महाराज गाडीवर बसले, तसा तो गाडीवान गाडीच्या खाली उतरला. महाराज त्याला म्हणाले :
तयी महाराज वदले त्यास।
का रे खाली उतरलास?।
आम्हा परमहंसांस।
विटाळाची बाधा नसे।। ३६।।
इथे महाराजांनी जातीभेद नसावा याबद्दल अतिशय समर्पक असे तत्त्व सांगितले आहे. एका दोयातून हेच तत्त्व सांगितले जाते
जात-पात पूछत नही कोई।
हरी को भजे सो हरी का होई।
एवढे महाराजांनी सांगितल्यावर हा गाडीवान म्हणतो :
महार बोले त्यावरी।
महाराज तुमच्या शेजारी।
मी न बसे गाडिवरी।
ते आम्हा उचित नसे।। ३७।।
मारूती रामरूप झाला।
परी रामासन्निध नाही बसला।
तो उभाच पाहा राहिला।
कर जोडूनी रामापुढे।। ३८।।

यावर महाराज त्याला म्हणाले, ‘बरं बाबा. तुझी मर्जी’ आणि महाराजांनी बैलांना आज्ञा केली. ‘बैलांनो, गाडीवाल्याच्या मागून नीट चला’ आणि चमत्कार पाहा, बैल बरोबर सांकेतिक स्थळास पोहोचले. माणसेच काय, पशू-पक्षी सुद्धा महाराजांच्या आज्ञेने वागत, असे आपण ग्रंथातील विविध अध्यायात पाहिले आहे.

(गोविंद बुवांचा द्वाड घोडा शांत केला, सुकलालाची गाय महाराजांच्या चरणी विनम्र झाली. द्वारकेश्वर येथे भास्कर महाराजांच्या ‘संत भंडाऱ्यात’ त्रास देणारे कावळे तेथून निघून गेले. आणि आता या अध्यायामध्ये गाडीचे बैल गाडीवाल्याविना सांकेतिक स्थळास नीट येऊन पोहोचले) समर्थ नवीन बांधकामाच्या जागेवर येऊन बसले. ती जागा आहे दोन सर्वे क्रमांकाच्या मध्यभागी. त्या दोन्ही सर्वे क्रमांकामधून थोडी थोडी जागा घेऊन काम सुरू झाले. समधीमध्य साधण्याकरिता जागा थोडी कमी पडली. त्यासाठी म्हणून अकरा गुंठे जमीन जास्त घेऊन बांधकाम चालविले. पुढाऱ्यांना वाटले, करी साहेबांनी वचन दिले आहे की, जागा व्यवस्थित केल्यास एक एकर अजून जागा देऊ. त्यामुळे बांधकाम सुरू केले. पण एका दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाने ही बातमी दिली. त्यामुळे पुढारी मनातून थोडे घाबरले. हरी पाटील समर्थांना बोलले की, ‘महाराज अकरा गुंठे जागेचा तपास करावयास एक जोशी नावाचा अधिकारी आला आहे. महाराजांनी हसत हसत हरी पटलांना शब्द दिला. ‘जागेबद्दल जो काही दंड तुम्हाला झाला आहे, तो माफ होईल.’ त्या जोशी अधिकाऱ्याला महाराजांनी स्फूर्ती दिली. त्याने त्या चाललेल्या प्रकरणावर शेरा दिला की, ‘मी चौकशी करून आलो. हा दंड होणे उचित नाही. दंडाची रक्कम गजानन संस्थेला परत करावी.’ असा हुकूम जेव्हा आला, तेव्हा हरी पाटलांना विशेष आनंद झाला त्यांना विश्वास होता की, संत वाक्य खोटे होणार नाही. या आधी नुकतेच माझ्यावर एक किटाळ येऊन गेले. त्यावेळी महाराजांनी मला सांगितले होते, ‘भिऊ नकोस. तुझ्या केसालापण धक्का लागणार नाही.’ हे समर्थवाक्य ज्याप्रमाणे खरे झाले तसेच आजदेखील महाराजांचे वाक्य खरे झाले आहे.

क्रमशः

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

11 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

12 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

12 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

13 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

14 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

14 hours ago