Saturday, December 14, 2024
Homeमहत्वाची बातमीSanjay Raut : धमकीचा बनाव संजय राऊत यांनी स्वत:च रचला!

Sanjay Raut : धमकीचा बनाव संजय राऊत यांनी स्वत:च रचला!

भाजप आमदार नितेश राणेंनी उघडं पाडलं मयुर शिंदे आणि राऊत कनेक्शन

मुंबई: संजय राऊत यासारख्या मच्छरला मारण्यासाठी धमकीची काय गरज असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं होतं. आज नितेश राणे यांनी संजय राऊत धमकीप्रकरणी अटक करण्यात आलेला मयुर शिंदे हा संजय राऊत आणि सुनील राऊत यांचाच माणूस असून संजय राऊत यांनी धमकीचा बनाव रचल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे, पोलिस सुत्रांनीही संजय राऊत यांनी हा बनाव रचल्याच्या गौप्यस्फोटाला पुष्टी दिली आहे.

संजय राजाराम राऊत यांनी हा बनाव रचल्याचे कबुल करावे असे नितेश राणे यांनी म्हटले आहे तसेच अशा लोकांचे पोलिस संरक्षण काढून टाकण्यात यावे अशी मागणी गृहमंत्र्यांकडे त्यांनी केली आहे. हे सर्व सांगताना संजय राऊत आणि सुनील राऊत यांचे मयुर शिंदे याच्यासोबतचे अनेक फोटोही नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दाखवले. तसेच उद्धव ठाकरे सध्या कुठे आहेत? ते लंडनला स्थायिक झाले का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यावर धाड पडताच ते गायब झाले. श्रीधर पाटणकर यालाही ते लवकरच गायब करतील आणि हे कुटुंब कायमचं लंडनला स्थायिक होईल असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला.

हेही वाचा…

संजय राऊत स्वत:लाच धमकी देतात! विखे पाटीलांनी उडवली खिल्ली

संजय राऊतांचा अग्रलेख मालकाला अडचणीत आणण्यासाठी…

संजय राऊत यांनी आजचा अग्रलेख हा मुद्दामहुन त्यांचा मालक उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी लिहिला आहे. असा आरोपही नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केला. ते म्हणाले, सामना ही फक्त काळा पैसा पांढरा करण्याची मशीन आहे. संजय राऊत यांनी वेळोवेळी उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचे काम केले आहे. त्यांच्या भांडूप  वॉर्डमध्ये उबाठा हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. सुनील राऊत यांनी मानसिक छळ केल्याचं सांगत उबाठा गटाच्या माजी ज्येष्ठ नगरसेविका सुवर्णा करंजे यांनी एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे ज्या मतदार संघात राहतात तिथून अनिल परब हा त्यांचा जवळचा माणूस एकदाही निवडून आलेला नाही असा, घणाघात नितेश राणे यांनी केला. संजय राऊत भांडूपमध्ये पक्ष वाढवू नाही शकत, उद्धव ठाकरे कलानगरच्या पुढे नाही जाऊ शकत, तर ही लोक काय पक्ष वाढवणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

जेलमधून सुटण्याच्या तारखा गिरवतील

महाविकास आघाडी सरकार पडणार याची तारीख संजय राऊत यांनी फेब्रुवारीमध्ये दिली होती. आता आणखी दोन महिने पुढे ढकलले. उलट मालक लंडनला पळून गेल्यावर संजय राऊत जेलमध्ये कैद्याच्या गणवेशात दिसतील. तिथे ते कॅलेंडरवर त्यांच्या सुटण्याच्या तारखा गिरवत बसतील असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांच्या काळ्या पैशावर संजय राऊत यांनी अग्रलेख लिहावा असे आव्हानही नितेश राणे यांनी संजय राऊत यांना दिले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -