Saturday, January 18, 2025
Homeताज्या घडामोडीBiparjoy Cyclone : बिपरजॉयने बदलला मार्ग; रात्री धडकणार

Biparjoy Cyclone : बिपरजॉयने बदलला मार्ग; रात्री धडकणार

जाखाऊ बंदराजवळील किनारपट्टीला धोका

Biparjoy Cyclone : सध्या रौद्ररुप धारण केलेलं बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या (Gujarat) दिशेनं सरकत असल्याची बातमी सकाळीच समोर आली होती. मात्र आता मिळत असलेल्या माहितीनुसार हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकून गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र लगतच्या (kutch and Suarshtra) तसेच पाकिस्तान किना-यालगतच्या कराची आणि गुजरातमधील मांडवी दरम्यान असलेल्या जाखाऊ बंदराजवळील किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ रात्री ९.३० च्या सुमारास धडकू शकते. किनारपट्टीवर आदळण्यापूर्वी वादळाचे स्वरुप मवाळ होण्याची शक्यता आहे. असे असले तरी त्यात हानी पोहचवण्याची क्षमता आहे.

गुजरातच्या सौराष्ट्र आणि कच्छ भागात बुधवारी जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि ताशी १२५ किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, हा वेग १४५ किमी प्रतिताशीपर्यंत पोहोचू शकतो. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये दोन ते तीन मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच सखल भागात पाणी भरू शकते. चक्रीवादळ कराची आणि मांडवी किनारपट्टी ओलांडेल तेव्हा वाऱ्याचा वेग ११५-१२५ किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे, अशी माहिती आयएमडी दिल्लीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी दिली.

या वादळादरम्यान खबरदारीचे उपाय म्हणून तब्बल ७४ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. तसेच NDRF ची ३३ पथके तैनात करण्यात आली आहेत. कच्छ, सौराष्ट्र हा परिसर ओलांडल्यानंतर या वादळाचा प्रभाव १६ जून रोजी दक्षिण राजस्थानवर दिसणार आहे. १७ जूननंतर परिस्थिती सुधारू शकते. ६-७ जून रोजी आग्नेय अरबी समुद्रावर बिपरजॉय तयार झाले. यानंतर ११ जून रोजी त्याचे तीव्र वादळात रूपांतर झाले.

संबंधित बातम्या –

Cyclone Biparjoy: आज बिपरजॉय धडकणार! पण….

Cyclone Biparjoy: बिपरजॉय वादळाने धडकण्याच्या आधीच ९ जणांचा घेतला बळी

Cyclone Biporjoy: बिपरजॉयचं रौद्ररुप! ट्रेलरला सुरुवात….

Cyclone Biperjoy : बिपरजॉय चक्रीवादळाची धडकी; कच्छ-सौराष्ट्रातील किनारपट्टीपासून १० किमीपर्यंतचा परिसर केला रिकामा

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा पाकिस्तान नव्हे, गुजरातला मोठा फटका बसणार; सतर्कतेचा इशारा! भूकंपाचाही धोका!

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ उत्तरेकडे सरकल्याने राज्यात पोषक वातावरण

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा मार्ग बदलल्याने गुजरात आणि पाकिस्तान किनारपट्टीला धोका

बिपरजॉय चक्रीवादळ येत्या २४ तासात धडकणार!

‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा जोर वाढला!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -