कोलकाता: कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळात काल रात्री आग लागल्याची बातमी समोर आली. मात्र, आता आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलानं शर्थीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली आणि सर्व प्रवाशांना टर्मिनलच्या आतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं.
आगीचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. कोलकाता विमानतळाच्या (Kolkata Airport) अधिकाऱ्यांनी वर्तवलेल्या शक्यतेनुसार, आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचं बोललं जात आहे. आगीनंतर प्रवाशांमध्ये भीती आणि गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सर्व प्रवाशांना अग्निशमन दल आणि विमानतळावरी स्टाफनं सुखरूप बाहेर काढलं.