Monday, October 20, 2025
Happy Diwali

Weather Update: महाराष्ट्र, गुजरातमध्ये पाऊस पण देशात...

Weather Update: महाराष्ट्र, गुजरातमध्ये पाऊस पण देशात...

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनूसार देशाची राजधानी दिल्लीसह देशात अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णतेची लाट (Heatwave) सुरू आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रासह केरळ आणि आंध्र प्रदेशात मान्सूनने (Monsoon) हजेरी लावली आहे. तर बिपरजॉय चक्रीवादळामुळं अनेक राज्यांचे हवामान आल्हाददायक राहिले आहे.

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार केरळ, कर्नाटक, गोवा, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्र तसेच गोवा, गुजरात, लक्षद्वीप, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि अंदमान-निकोबार, सिक्कीममध्येही पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातील नैऋत्य भागात १६ ते १७ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, विविध राज्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, ओडिशाच्या अनेक भागात उष्णतेचा प्रकोप सुरूच आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ओडिशातील कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे.
Comments
Add Comment