
मुंबई: द कपिल शर्मा शो या प्रसिद्ध कॉमेडी शोमधील कपिलचा सहकलाकार तीर्थानंद राव याने फेसबुक लाइव्हसमोर आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तीर्थानंद राव या शोमध्ये नाना पाटेकर यांची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने फेसबुकवर लाइव्ह येऊन फिनाईलने भरलेला ग्लास प्यायला. याआधी १० मिनिटे त्याने कशामुळे आत्महत्येसारखे पाऊल उचलले याविषयी सांगितले.
तीर्थानंद रावने सांगितले की, तो एका महिलेसोबत लिव्ह इनमध्ये राहतो. त्या महिलेमुळे त्याच्यावर तीन ते चार लाख रुपयांचे कर्जही झाले आहे. ती महिला त्याला बेदम मारहाण करते, त्याचे मानसिक शोषण करते. असे सांगून तीर्थानंद रावने फिनाईलचा डब्बा उघडला आणि समोर ठेवलेल्या ग्लासमध्ये ओतून पूर्ण प्यायले. मिळालेल्या माहितीनूसार, त्याच्या काही मित्रांनी तात्काळ पोलिसांना बोलावले आणि त्याला रुग्णालयात नेले.
फेसबुक लाइव्ह दरम्यान तीर्थानंद राव याने, त्या महिलेचे नाव परवीन बानो असल्याचे सांगितले. तिच्या पतीचा २०१३ मध्ये मृत्यू झाला होता. तिला दोन मुलीही आहेत. ती महिला त्याला मानसिक त्रास देत असून त्याच्याचकडून पैसे आणि महागडे गिफ्ट्स उकळून तिने त्याच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केल्याचे त्याने सांगितले. तसेच त्याच्यावरच मारहाणीचा आरोप केल्याचे सांगितले. तिच्यासोबत तिची मुलगीही त्याला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचे त्याचे म्हणने आहे.
हेही वाचा...