
पुणे : पुण्यातील दोन दिवसांच्या विसाव्यानंतर (Pandharichi Wari) पंढरपुरला निघालेल्या (ashadhi wari) आषाढी वारीतील श्री संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांना पुणेकरांनी उत्साहात निरोप दिला.
यावेळी काही पावलं महिला पोलीस कर्मचारी देखील डोक्यावर तुळशीचे वृंदावन घेऊन चालल्या.
पुणे पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी देखील सहभागी झाल्या होत्या. त्याचे ट्विट त्यांनी शेअर केले आहे.
अवघा रंग एक झाला...वारीसोबत बंदोबस्त करताना डोक्यावर तुळशी वृंदावन घेणे परमभाग्यच होय.
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, इतर महिला अधिकारी वारीत चालत सहभागी झाल्या.#Palkhi2023 pic.twitter.com/jLf3fNBYhC
— पुणे शहर पोलीस (@PuneCityPolice) June 14, 2023