Wednesday, October 29, 2025
Happy Diwali

NEET-UG 2023 Result: वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी परिक्षा देणाऱ्यांनो ही बातमी तुमच्यासाठी!

NEET-UG 2023 Result: वैद्यकीय महाविद्यालयांत प्रवेशासाठी परिक्षा देणाऱ्यांनो ही बातमी तुमच्यासाठी!

नवी दिल्ली: देशातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षा (NEET-UG 2023) चा निकाल मंगळवारी रात्री जाहीर झाला. यात तामिळनाडूचा प्रभंजन जे आणि आंध्रचा बोरा वरुण चक्रवर्ती टॉपर ठरले आहेत. दोघांना ९९.९९ टक्के गुण मिळाले आहेत. तर यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आकडेवारीत उत्तर प्रदेशमधून सर्वाधिक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. यानंतर महाराष्ट्र आणि राजस्थानमधील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ही चाचणी घेते. यावेळी सुमारे २० लाख ८७ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ही परीक्षा वैद्यकीय प्रवेशासाठी आहे. त्याची परीक्षा ७ मे २०२३ रोजी झाली. देशातील ४९९ शहरांमधील चार हजारांहून अधिक केंद्रांवर त्याची परीक्षा घेण्यात आली. भारताशिवाय इतर १४ देशांमध्येही याचे आयोजन करण्यात आले होते. मणिपूरमधील हिंसाचारामुळे मणिपूरमधील विद्यार्थ्यांसाठी ६ जून रोजी वेगळी परीक्षा घेण्यात आली.

NEET-UG 2023: टॉपर्सची यादी

स्थिती नाव
1. प्रभंजन जे (तामिळनाडू) बोरा वरुण चक्रवर्ती (आंध्र प्रदेश)
2. कौस्तव बाओरी (तामिळनाडू)
3. प्रांजल अग्रवाल (पंजाब)
4. ध्रुव अडवाणी (कर्नाटक)
5. सूर्य सिद्धार्थ एन (तामिळनाडू)
6. श्रीनिकेत रवी (महाराष्ट्र)
7. स्वयं शक्ती त्रिपाठी (ओडिशा)
8. वरुण एस (तामिळनाडू)
9. पार्थ खंडेलवाल (राजस्थान)

या परिक्षेची कट ऑफ लिस्टही प्रसिद्ध करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी

  1. neet.nta.nic.in
  2. nta.ac.in

या संकेतस्थळांना भेट द्यावी.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >