Saturday, December 14, 2024
HomeदेशCyclone Biporjoy: बिपरजॉयचं रौद्ररुप! ट्रेलरला सुरुवात....

Cyclone Biporjoy: बिपरजॉयचं रौद्ररुप! ट्रेलरला सुरुवात….

कच्छ: बिपरजॉय चक्रि‍वादळाने रौद्ररुप धारण केलं आहे. ‘बिपरजॉय’च्या प्रभावामुळे गुजरातमधील अरवली जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. आज सकाळपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. काल मुंबईत किमान तापमानात लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्र प्रशासन हाय अलर्टवर आहे. हे अतितीव्र चक्रीवादळ गुजरात किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मांडवी आणि पाकिस्तानच्या कराची किनारपट्ट्टी भागात चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. गुजरातमधील आठ जिल्ह्यांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सौराष्ट्र आणि कच्छ यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी लोकांना वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आत्तापर्यंत ३७ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टी भागात वाऱ्यांचा वेग वाढला आहे. समुद्रात उंच लाटा उसळल्या आहेत. बिपरजॉय चक्रीवादळातील वाऱ्यांचा वेग १५० किमी प्रतितास आहे. हे चक्रीवादळ आता वेगाने गुजरातकडे सरकत आहे. यावेळी मोरबी, द्वारका, जामनगर, राजकोट, पोरबंदर येथे मुसळधार आणि अतिवृष्टी होण्याचा अंदाज असून त्यामुळे सखल भागात पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागात नुकसान होण्याची शक्यताही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. वादळामुळे झाडे पडू शकतात, कच्च्या घरांची पडझड होऊ शकते, पक्क्या घरांचंही नुकसान होऊ शकते, तसेच टेलिकॉम आणि रेल्वेच्या कामावरही परिणाम होऊ शकतो, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

अमित शहा यांची बैठक

१५ जून रोजी बिपरजॉय चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सरकारही याबाबत सतर्क झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल चक्रीवादळ बिपरजॉयच्या तयारीची आढावा बैठक घेतली. केंद्र सरकार आणि राज्यांनी मिळून ९ वर्षात अनेक आपत्तींना तोंड दिले आहे. या नवीन आपत्तीला तोंड देण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार असल्याचे मत अमित शाह यांनी व्यक्त केले. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे होणारे संभाव्य नुकसान कमी करणे हे आमचे उद्दिष्ट असल्याचे शाह म्हणाले.

एनडीआरएफची तयारी

बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. गुजरातमधील कच्छ आणि सौराष्ट्र या भागांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या १७ आणि एसडीआरएफच्या १२ पथके तैनात करण्यात आली आहेत.

काय म्हणाले मनसुख मांडविया?

त्याचवेळी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विट केले की, “बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या कच्छ जिल्ह्याकडे सरकत असताना रेशन आणि अन्नाची व्यवस्था आणि निवारागृहे उभारली जात आहेत. वैद्यकीय आणि आरोग्य आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी. दुसऱ्या ट्विटमध्ये ते म्हणाले, “बिपरजॉय चक्रीवादळासाठी आमचे सैन्य पूर्ण तयारी करत आहे. भुजच्या लष्करी तळावर मी या तयारीचा आढावा घेतला. या संभाव्य संकटाबाबत त्यांनी लष्कराच्या जवानांशीही चर्चा केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -