Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai Crime : वृद्धाश्रमातील मनोरुग्ण महिलांमध्ये मारहाण; एकीचा मृत्यू

Mumbai Crime : वृद्धाश्रमातील मनोरुग्ण महिलांमध्ये मारहाण; एकीचा मृत्यू

नवी मुंबई : मनोरुग्ण असलेल्या दोन वृद्ध महिलांमध्ये झालेल्या हाणामारीत एकीचा मृत्यू झाला. ही घटना नवी मुंबई येथील ऐरोली सेक्टर-४ येथे घडली.

ऐरोली सेक्टर चारमध्ये एका रोहाऊसमध्ये ‘श्री स्वामी समर्थ सेवा संस्था’ द्वारे चालवला जाणारा वृद्धाश्रम आहे. या वृद्धाश्रमामध्ये मनोरुग्णांची सोय केली जाते. वृद्धाश्रमातील प्रत्येक खोली तीन ते चार मनोरुग्णांना ठेवले जाते. त्याच्या खाण्यापिण्याची आणि झोपण्याचीही सोय तिथेच केली जाते.

दरम्यान, काही कारणांवरुन एका खोलीतील दोन मनोरुग्ण वृद्ध महिलांचे भांडण झाले. त्यातून एका महिलेने जेवणाचे ताड डोक्यात घालून समोरच्या महिलेला जखमी केले. तसेच, तिला जोरात चावा घेऊन रक्तबंबाळही केले. यात पीडित महिलेचा मृत्यू झाला.

वृद्धाश्रमाने दिलेल्या तक्रारीत आरोपी असलेल्या वृद्ध महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, आरोपी महिलाही मनोरुग्णच असल्याने पोलिसांनी अद्याप तीला अटक केली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेच्या वृद्धाश्रमात रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास आरडाओरडा ऐकू आला. खोलीत झोपलेल्या एका ६५ वर्षीय महिलेने रात्रीच्या अंधारात उठत अन्य दोन महिलांवर जोरदार हल्ला चढवला. हल्ला झाल्याचे पाहून एका महिलेने पळ काढत खोलीतील स्वच्छतागृहात आश्रय घेत दरवाजा आतून बंद केला. दरम्यान, दुसरी महिला गाढ झोपल्याने तिला या हल्ल्याचा अंदाज आला नाही. ही महिला उठत असतानाच आरोपी महिलेने तिच्या डोक्यात जेवणाच्या ताटाच्या सहाय्याने एकापाठोपाठ केलेल्या प्रहारामुळे झोपलेली ६० वर्षी महिला गंभीर जखमी झाली. त्यातच पीडितेला कडकडून चावा घेतला. ज्यामुळे ही महिला गंभीर जखमी झाली.

वृद्धाश्रमातील सेविका जेव्हा सकाळी साडेनऊच्या सुमारास वृद्धांच्या खोलीत आल्या तेव्हा घडला प्रकार उघडकीस आला. दरम्यान, खोलीत कोणीतरी बाहेरील व्यक्ती आली असल्याचे समजताच स्वच्छतागृहात लपलेली दुसरी महिलाही बाहेर आली. तिने घडलेला प्रकार सांगितला. पीडित महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिला मृत घोषीत केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -