Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

Juhu Chowpatty : जुहू चौपाटीवर बुडालेल्या तीन मुलांचे मृतदेह सापडले, एकजण अद्यापही बेपत्ता!

Juhu Chowpatty : जुहू चौपाटीवर बुडालेल्या तीन मुलांचे मृतदेह सापडले, एकजण अद्यापही बेपत्ता!

मुंबई : जुहू चौपाटीवर (Juhu Chowpatty) सोमवारी सायंकाळी समुद्रात बुडालेल्या तीन मुलांचे मृतदेह तब्बल २० तासांच्या शोध मोहिमेनंतर सापडले आहेत. परंतु जय रोहन ताजभारिया (१६) याचा शोध अद्याप सुरू आहे.

'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभाग, पालिका प्रशासनाकडून देण्यात आला असतानाही सांताक्रूझ वाकोला येथील पाच मुले जीवरक्षक दल, पोलीस तसेच स्थानिकांची नजर चुकवून समुद्रात गेले. या पाचही जणांना स्थानिकांनी हटकले आणि तेथून निघून जाण्यास सांगितले. मात्र, त्याकडे मुलांनी दुर्लक्ष केले. याचा परिणाम म्हणजे खवळलेल्या समुद्रात ते बुडाले, अशी माहिती स्थानिकांनी दिल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले.

ही मुले समुद्रात बुडत असल्याचे निदर्शनास आल्यावर तेथील कोळी बांधवांनी धर्मेश ताजभारिया (१६) याला कसेबसे समुद्राबाहेर काढण्यात यश आले. मात्र, इतर चौघे जण समुद्रात बुडाले.

सोमवारी वाकोला परिसरातील ८ मुलांनी पाऊस पडत असल्याने ते क्रिकेट खेळायला जात आहेत, असे सांगितले. त्यांनी १० ते २० रुपये घेतले. पण ते जुहू चौपाटीवर जात असल्याची माहिती दिली नाही. संध्याकाळी मुले बुडाल्याचे समजले. यापैकी दोघे सख्खे भाऊ आहेत.

मृत मुलांची नावे

मनीष योगेश ओगानिया (१६) शुभम योगेश ओगानिया (१५) धर्मेश वालजी फौजिया (१६)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा