Thursday, May 22, 2025

विदेशताज्या घडामोडीराजकीय

MLA Nitesh Rane Facebook Live : उद्धव ठाकरे पळून गेले काय? तारीख पे तारीख देतायत....नेमके परत कधी येणार?

MLA Nitesh Rane Facebook Live : उद्धव ठाकरे पळून गेले काय?  तारीख पे तारीख देतायत....नेमके परत कधी येणार?

सामना अग्रलेखातील भाजपवरील टीकेवर नितेश राणे यांचा जोरदार प्रहार


MLA Nitesh Rane Facebook Live: संजय राजाराम राऊत यांनी हिम्मत असेल तर सुप्रिया सुळे यांनी गद्दारांवर केलेल्या वक्तव्यावर अग्रलेख लिहून दाखवावा. पण सिल्वर ओकवरुन अर्धा पगार येतो त्यामुळे ते हे धाडस करणार नाहीत, अशा शब्दांत भाजप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सामनाच्या आजच्या अग्रलेखावर प्रहार केला.


ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या कानाला त्रास होतोय म्हणून टीका करणाऱ्या संजय राऊत यांनी लक्षात घ्यावे की त्यांच्या मालकाची मान ही दिल्लीसमोर वाकुन-वाकुन दुखतेय त्यामुळे त्याची सर्जरी करावी लागली. भाजपाच्या नेत्यांची भ्रष्टाचाराची ईडी आणि सीबीआय चौकशीची मागणी करता तशी नंदकिशोर चतुर्वेदी यांनी उद्धव ठाकरे यांना किती खोके दिले या चौकशीचीही मागणी करा ना. त्याच्यावरही एक अग्रलेख लिहा ना. उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याचीही चौकशी करा.


नंदकिशोर चतुर्वेदीचं प्रकरण बाहेर निघताच उद्धव ठाकरे हे त्यांच्या परिवारासह पळून गेले आहेत अशी बातमी आमच्या कानावर आली आहे. आधी ९ तारखेला येणार होते नंतर १२ तारखेला पण ठाकरे परिवार आता भारतात परत येणार नाही अशीच बातमी आहे. तसंच ते आता मौनीबाबा होऊन बसले आहेत अशी टीकाही नितेश राणे यांनी केली. आमच्या जाहिरातीवर बोलण्याआधी मुख्यमंत्री असताना उत्कृष्ट मुख्यमंत्र्याचा सर्वे कर्जतच्या फार्महाऊसवरुन केला होता का असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.


ते पुढे म्हणाले, बाळासाहेबांचा तुम्हाला आता खुप पुळका येतो. पण आज सकाळी मी ट्वीटरवर जाहिरात टाकली आहे ती पाहिली का? त्या वज्रमुठ सभेच्या जाहिरातीत बाळासाहेबांचा फोटो कुठे आहे? मुंबईत जेव्हा पावासाने पाणी भरलेलं तेव्हा उद्धव ठाकरे बाळासाहेबांना टाकून आलिशान हॉटेलमध्ये राहायला गेले होते. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी उद्धव ठाकरे बाहेरगावी पार्ट्या करत होते. पण उद्धव ठाकरे त्यांचा म्हातारा म्हणून उल्लेख करायचे. रश्मी ठाकरे यांनी त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणण्याचेही सोडले होते, अशा शब्दांत नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे वाभाडे काढले.



कान टोचले!


यावेळी नितेश राणे यांनी संजय राऊत सारख्या घरफोड्या माणसाला त्याचा धंदा चालवण्याची संधी देऊ नये. देवेंद्रजी आणि एकनाथजींच्या नेतृत्वाखाली आपलं सरकार उत्तम चाललं आहे असा टोला लगावला.

Comments
Add Comment