दंगलीवरही केले भाष्य; दंगली मागे कटकारस्थानची शक्यता
नाशिक : नाशिक महापालिकेला आयुक्त नसणे हा गंभीर विषय आहे. शहराच्या विकासासाठी आयुक्त आवश्यक आहे. आयुक्त मिळायला पाहिजे या मताशी मी सहमत असल्याचे वक्तव्य करत मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी राज्य शासनाला घरचा आहेर दिला आहे.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शहराध्यक्ष गिरिश पालवे, जिल्हाध्यक्ष केदार आहेर, आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, लक्ष्मण सावजी, विजय साने, गोविंद बोरसे, पवन भगुरकर आदी उपस्थित होते. शेलार म्हणाले की, देशात प्रत्येक ठिकाणी भाजपचे महासंपर्क अभियान सुरु आहे. बुथ आणि शक्ती स्थळावर काम सुरू असून ९ वर्षात केंद्र शासनाने केलेली कामे प्रामाणिकपणे सांगत आहे. देशाच्या इतिहासातील सर्वात मोठे अभियान आहे.
भाजप असा एकमेव आणि पहिला पक्ष आहे. २३ तारखेला बुथ समितीच्या लोकांशी पंतप्रधान मोदी देशभरतील कार्यकर्त्यांशी बोलणार आहे. काँग्रेसने सत्तेत असताना हिशोब देण्याची कधी अशी हिंमत दाखवली नाही. खा.संजय राऊत हे कंपाऊंडरकडून औषध घेतात. त्यांच्यावर लोकांचा भरोसा नसून त्यांच्या प्रिसक्रीप्शनवर लोकांचा विश्र्वास राहिलेला नाही. देशात मोदी अन् महाराष्ट्रात शिंदे या जाहिरातीबाबत मुख्यमंत्री शिंदे अन प्रदेश अध्यक्ष बावनकुळे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस देखील यावर बोलले आहेत. त्यामुळे मी कार्यकर्ता असून यावर बोलू शकत नाही. राज ठाकरे यांना भाजपचे नेते जाऊन भेटतो. त्यामुळे लगेच त्यांची अन् आमची युती होईल असे नाही. ही भेट कौटुंबिक, व्यक्तिदेखील असू शकते. आज त्यांचा वाढदिवस असल्याने त्यांना दीर्घायुष्य मिळो, अशी परमेश्वराकडे प्रार्थना असल्याचे शेलार यांनी सांगितले. अभिनव भारतच्या मंदिराबाबत ६ कोटीचा निधी मिळाला आहे. भाडेकरीसह इतर अडचणी दूर झाल्या आहेत. त्यामुळे २,३ दिवसात टेंडर निघेल अन् लवकरच कामाला सुरुवात होईल, असे आ. देवयानी फरांदे यांनी सांगितले .
दंगली मागे कटकारस्थानची शक्यता
राज्यात दंगल घडविण्याचे प्रकार घडले आहेत. कटकारस्थान असल्याची आमची शंका आहे. याची सखोल चौकशी सुरू असून, लवकरच सत्य बाहेर येईल. या अगोदरच्या आाघाडी सरकारच्या काळात अनेक गैरप्रकार घडले आहेत. त्यावेळी घरात जाऊन डोळे फोडले आहेत. कोविड सेंटरमध्ये महिलांच्या तक्रारी आहेत. सत्ता असो वां नसो हिंदू जागरण हे आमचे काम आहे, म्हणून जनआक्रोश मोर्चा काढत आहे. यात वातावरण दुषित होत नसल्याचे शेलार यांनी सांगितले.
लोकसभा जागा वाटपचा निर्णय हायकमांड घेणार
लोकसभा जागा वाटपबाबत अद्याप झाले नसल्याचे शेलार यांनी सांगितले. नाशिकमध्ये भाजपचे काही इच्छुक आपल्याला उमेदवारी मिळाली असा आविर्भावात प्रचार करत असतील ते चुकीचे आहे. खाली कोणी असे वातावरण करू नये. आपल्या पक्षाचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे याबाबत पुढील काळात सर्वच सजगतेने काम करतील असा विश्वासही शेलार यांनी व्यक्त केला.