इम्फाळ : मणिपूरमध्ये इम्फाळ पूर्वेकडील खामेनलोक भागात पुन्हा एकदा आज सकाळी हिंसाचार (Manipur Violence) उसळला. यावेळी झालेल्या गोळीबारात नऊ जणांचा मृत्यू आणि १० जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अज्ञात हल्लेखोरांनी चर्चमध्ये गोळीबार केला आहे. या गोळीबारात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींना इंफाळ येथील राज मेडिसिटी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेत कुकी दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून शवविच्छेदन प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक शिवकांता सिंग यांनी दिली.
याआधी पाच दिवसांपूर्वी अज्ञात हल्लेखोरांनी मणिपूरच्या कांगपोकपी जिल्ह्यातील कुकी गावात हल्ला केला होता. या हल्ल्यात एका वृद्ध महिलेसह तीन जणांचा मृत्यू झाला होता.