Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीAdditional Collector Office : शिर्डी आणि चिमूर येथे नवे अपर जिल्हाधिकारी कार्यालय

Additional Collector Office : शिर्डी आणि चिमूर येथे नवे अपर जिल्हाधिकारी कार्यालय

मंत्रीमंडळाची मान्यता मिळाल्याची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती

मुंबई : सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राज्यात शिर्डी आणि चिमूर येथे अपर जिल्हाधिकारी कार्यालय (Additional Collector Office) स्थापन करण्यात येणार असून याबाबतचा अतिशय महत्त्वाचा ठराव आज मंत्रीमंडळ बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.

जिल्हा प्रशासनाचे बळकटीकरण करण्याच्या तसेच शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व चंद्रपूर जिल्हयातील चिमूर येथे येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करणे बाबतचा प्रस्ताव राज्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्रीमंडळ बैठकीत मांडला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत सदर प्रस्तावास एकमताने मान्यता देण्यात आल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी येथे स्वतंत्र अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर संगमनेर, अकोले व राहूरी या तालुक्यांचा समावेश असणार आहे. तसेच उच्चस्तरीय सचिव समितीने सदर कार्यालयासाठी अपर जिल्हाधिकारी, नायब तहसिलदार व लघुलेखक (निम्नश्रेणी) अशा नव्याने निर्माण करण्यात आलेल्या प्रत्येकी एका पदास आणि एकूण तीन पदांना, तर अव्वल कारकूनचे एक पद व लिपीक टंकलेखकची दोन पदे या अतिरिक्त ३ नवीन अशा एकूण ६ पदांनाही आज मान्यता देण्यात आली. या निर्णयामुळे शिर्डी कार्यक्षेत्रातील सर्व सामान्य नागरिकांना शासकीय कामकाजासाठी स्वतंत्र जिल्हाधिकारी कार्यालय लवकरच उपलब्ध होणार असल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

तसेच चंद्रपूर जिल्हयातील चिमूर येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यासाठी यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सदर कार्यालय कार्यान्वित करण्यास मान्यता दिली आहे. चिमुर जि.चंद्रपूर येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालयात मंजूर ६ नियमित पदांपैकी अपर जिल्हाधिकारी विशिष्ट वेतनश्रेणीतील एका पदास मंत्रीमंडळाने मान्यता देण्यात आल्याचे सांगितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -