Friday, July 11, 2025

Mumbai-Pune Expressway Fire Accident : खंडाळा घाटात केमिकल टँकर अपघातात ४ जणांचा मृत्यू

Mumbai-Pune Expressway Fire Accident : खंडाळा घाटात केमिकल टँकर अपघातात ४ जणांचा मृत्यू

मदतीसाठी आलेल्या क्रेनला देखील आग, दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा


पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway Fire Accident) खंडाळा घाटात ऑईल टँकरला भीषण आग लागली. यामुळे मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली.


मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळ्यात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या केमिकल टँकरला झालेल्या अपघातात आगीचा भडका उडाल्याने चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. या घटनेत परिसरही आगीने वेढला असून अनेक वाहने आगीत भस्मसात झाली. आज (मंगळवारी) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.



केमिकलमुळे द्रुतगती मार्गावर आगीचे लोट पसरल्याने पुण्या मुंबई दरम्यानची तसेच कुणेगावकडे जाणारी वाहतूक विस्कळित झाली. टँकरने पेट घेतल्यानंतर आगीचे काही लोट पुलावरून खाली पडले.


यावेळी कुणेगाव पुलाखालील काही वाहने जळाली असून एका दिवसाची व आगीचा लोट पडल्याने चौघांचा बळी गेल्याची भीती व्यक्त होत आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहे. मदतीसाठी आलेल्या क्रेनला देखील आग लागली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा