Sunday, May 11, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडी

Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय

Cabinet Decision : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले 'हे' महत्त्वाचे निर्णय

कंत्राटी कामगार व शेतक-यांना मोठा दिलासा


मुंबई : आज सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या (Cabinet Decision) बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत कंत्राटी कामगार व शेतक-यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंत्राटी ग्रामसेवकांच्या वेतनात तब्बल १० हजार रुपयांची वाढ होणार आहे. तर पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सुधारित दराने तात्काळ मदत करण्यात येणार असून १,५०० कोटींची मान्यता देण्यात आली आहे.


कंत्राटी ग्रामसेवकांचे वेतन ६ हजार होते, मात्र आता त्यात १० हजारांची वाढ होऊन वेतन १६ हजार होणार असल्याने ही त्यांच्यासाठी खुशखबर आहे. तसंच शेतक-यांना आताच्या नवीन दराप्रमाणे मदत मिळणार आहे. जिरायती शेतीला ८,५०० तर बागायती शेतीला १७,००० रुपये या दराने मदत मिळणार आहे. त्यामुळे ही शेतक-यांसाठी दिलासादायक बाब आहे.


या मोठ्या निर्णयासोबतच आणखी काही महत्त्वाचे निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले आहेत.


१. कंत्राटी ग्रामसेवकांच्या मानधनात वाढ वेतनात १० हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.


२. सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी १,५०० कोटी रुपयांची मान्याता देण्यात आली आहे.


३. अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी निर्वाह भत्त्यात सुधारणा करण्यात आलेली आहे.


४. पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिष्यवृत्तीत वाढ करण्यात आली आहे.


५. अतिरिक्त न्यायालये व जलदगती न्यायालयांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.


६. चिमूर आणि शिर्डी येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन केलं जाणार आहे.


७. लातूर येथे पशुरोग निदान प्रयोगशाळा स्थापन करण्यात येणार आहे.


८. पुणे येथे ४ अतिरिक्त कौटुंबिक न्यायालये स्थापन केली जाणार आहेत.


९. मानसिक आजारमुक्त व्यक्तींकरता पुनर्वसन गृहे योजना राबवण्यात येणार आहे.


१०. स्वातंत्र्य सैनिकांना घरांसाठी जमीन देण्यासाठी कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा वाढविली आहे.

Comments
Add Comment