Wednesday, October 9, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमान्सून आपत्तींचा सामना करण्यासाठी पालिका सज्ज

मान्सून आपत्तींचा सामना करण्यासाठी पालिका सज्ज

  • मुंबई डॉट कॉम: अल्पेश म्हात्रे

पथकांकडे तरंगणारे तराफे, लाईफ जॅकेट्स, दोरांसह लाईफ बुआईज, प्रथमोपचार संच उपलब्ध असतील. तटरक्षक दलाचा निशुल्क हेल्पलाइन क्रमांक १९५४ आहे. भारतातील तटरक्षक दलाचा वरळी येथील नियंत्रण कक्ष महापालिकेच्या मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाशी हॉटलाइनद्वारे जोडण्यात आलेला आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, मुंबईत कोणत्याही प्रकारची आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास त्वरित मदतकार्याकरिता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या ३ तुकड्या अंधेरी क्रीडा संकुल येथे तैनात आहेत. सन २०२३ च्या मान्सुनकरिता जास्त धोकादायक दरडी कोसळण्याची शक्यता असणाऱ्या एम/पश्चिम, एन आणि एस विभागांकरिता दोन जादा पथके दिनांक ८ जून २०२३ पासून तैनात करण्यात आली आहेत. अधिकारी व जवान मिळून एका तुकडीचे संख्याबल ४५ इतके आहे. या पथकाकडे अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध आहे. या पथकातील जवान व अधिकारी विविध प्रकारच्या आपत्तींमध्ये शोध व बचावकार्य करण्याकरिता प्रशिक्षित आहेत. अनिरुद्ध अ‍ॅकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे एकूण १२८ स्वयंसेवक व हॅम ऑपरेटर्स मान्सून कालावधीत विभागवार ऑन कॉल असणार आहेत. आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ मदतीकरिता त्यांचा उपयोग करण्यात येईल.

कुलाबा वेधशाळेकडून अतिवृष्टीचा इशारा प्राप्त झाल्यास तसेच आणीबाणी परिस्थितीबाबत नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्याकरिता भ्रमणध्वनी कंपन्यांच्या माध्यमातून लघुसंदेश पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई शहर व उपनगरात ६० ठिकाणी ६० स्वयंचलित पर्जन्यमापन केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. या पर्जन्यमापन केंद्रांद्वारे दर १५ मिनिटांचा अहवाल नागरिकांच्या माहितीसाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या “dm.mcgm.gov.in” या संकेतस्थळावर स्वयंचलित पद्धतीने नियमित स्वरूपात अद्ययावत केला जातो. “dm.mcgm.gov.in” या संकेतस्थळावर मान्सून कालावधीत माहिती प्रामुख्याने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

समुद्रास येणाऱ्या भरती-ओहोटीच्या वेळा व लाटांची उंची, कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त हवामान अंदाज, मुंबई शहर व उपनगरात होत असलेल्या पावसाचा दर १५ मिनिटांचा अद्ययावत अहवाल, पाणी तुंबल्यामुळे वळविण्यात आलेल्या वाहतुकीची माहिती, लोकल ट्रेन्सची वाहतूक विलंबाने होत असल्यास त्याबाबतची रेल्वे नियंत्रण कक्षाकडून प्राप्त अद्ययावत माहिती, विमानतळावरील विमानांच्या आगमनावर काही परिणाम झाला असल्यास त्याची माहिती, आपत्कालीन व्यवस्थापन कक्षामार्फत आग, दरड कोसळणे, इमारत कोसळणे, बॉम्बस्फोट इत्यादी प्रकारच्या आपत्तींमध्ये काय करावे व काय करू नये, याबाबतची माहिती देणारे २० अ‍ॅनिमेटेड तयार करण्यात आले आहेत. हे सर्व माहितीपट “dm.mcgm.gov.in” या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत नागरिकांकरिता “Disaster Management BMC” हे अ‍ॅप्लिकेशन ‘प्ले स्टोअर’च्या माध्यमातून मोफत डाऊनलोड सुविधेसह उपलब्ध करून देण्यात आले आहे. शहरातील पावसाळी, भौगोलिक परिस्थितीची माहिती, आणीबाणीप्रसंगी संपर्क कुठे साधावा. याबाबतची माहिती अशा विविध प्रकारच्या बहुउपयोगी माहितीने हे मोबाइल अॅप सुसज्ज आहे.

ज्या नागरिकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड केले असेल अशा नागरिकांना समुद्रास ४.५ मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटांची वेळ व उंची तसेच वेधाशाळेमार्फत जोरदार, अतिजोरदार, मुसळधार पावसाच्या अंदाजाची माहिती नोटिफिकेशनद्वारे प्राप्त होणार आहे. या मोबाइल अ‍ॅपवर भारतीय हवामान खात्याच्या कुलाबा व अंधेरीस्थित दोन्ही डॉपलर रडारवरील ढगांची सद्यस्थिती, उपग्रह प्रतिमांचे निरीक्षण करावयाचे असल्यास त्याकरिता थेट कुलाबा वेधशाळेशी जोडणारी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पाणी तुंबल्यामुळे वळविण्यात आलेल्या वाहतुकीची माहितीदेखील या अ‍ॅपवर उपलब्ध असणार आहे. लोकल ट्रेन्सची वाहतूक विलंबाने होत असल्यास त्याबाबतची रेल्वे नियंत्रण कक्षाकडून प्राप्त अद्ययावत माहिती देखील या अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विमानतळावरील विमानांच्या आगमनावर काही परिणाम झाला असल्यास त्याची माहिती देखील अॅपवर असणार आहे. आपल्या विभागातील पाणी साचण्याची ठिकाणे, संभाव्य दरडी कोसळण्याची ठिकाणे, मोडकळीस आलेल्या इमारती (C-I) याबाबतची माहिती सोबतच तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आलेल्या महापालिकेच्या शाळा, विविध नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्तीत नागरिकांनी काय करावे व काय करू नये याची माहिती या अ‍ॅपवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
· या मोबाइल अॅपवर ‘SOS’ ही वैशिष्ट्यपूर्ण सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये आपल्या जवळच्या नातेवाइकांचे, मित्रांचे भ्रमणध्वनी क्रमांक जतन करण्याची सुविधा आहे. काही आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास या अ‍ॅपवर असणाऱ्या ‘SOS’ सुविधेवर भ्रवणध्वनी धारक क्लिक करू शकतो. त्यानंतर लगेचच ज्यांचे भ्रवणध्वनी क्रमांक मोबाइल अॅपवर जतन केले आहेत, त्या सर्वांना भ्रमणध्वनी धारकाच्या भौगोलिक स्थानाच्या माहितीसह तत्काळ लघुसंदेश जातील. ज्यामुळे संबंधित भ्रमणध्वनी धारकास तत्काळ मदत मिळू शकेल. या सुविधेसाठी भ्रमणध्वनीमध्ये जीपीएस सुविधा कार्यान्वित असणे आवश्यक आहे. या भ्रमणध्वनी अ‍ॅपवर ‘Emergency’ हे वैशिष्ट्यपूर्ण व सुविधाजनक बटन देण्यात आले आहे. या बटनावर क्लिक केल्यास भ्रमणध्वनी धारक ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणच्या ५०० मीटर त्रिज्येच्या (Radius) परिसरातील रुग्णालये, अग्निशमन केंद्र, पोलीस ठाणे तसेच महापालिकेच्या विभाग कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक तत्काळ दिसणार आहेत व त्यावर क्लिक केल्यास संबंधित ठिकाणाशी लगेचच संपर्क साधणे शक्य होणार आहे.

या अ‍ॅपवर असणाऱ्या ‘Safety Tips’ या सुविधेअंतर्गत २० वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्तींच्या अनुषंगाने काय करावे व काय करू नये याबद्दल अत्यंत माहितीपूर्ण अशा २० अ‍ॅनिमेटेड फिल्म्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांना महापालिकेशी संपर्क व समन्वय साधता यावा याकरिता इतर सामाजिक माध्यमांच्या उदा. फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, चॅटबॉटच्या लिंक या अॅपवर उपलब्ध असणार आहेत. पालिकेचा आपत्कालीन व्यवस्थापन विभाग आणि राष्ट्रीय समुद्रीतट संशोधन केंद्र यांच्यामार्फत संयुक्तरीत्या पूरप्रवण क्षेत्राची आगाऊ सूचना देणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे.

IFLOWS ही मान्सून कालावधीत हवामान अंदाज व पर्जन्यवृष्टीचे निरीक्षण करून संभाव्य पूरपरिस्थितीची आगाऊ सूचना देणारी प्रणाली आहे. ही प्रणाली ६ ते ७२ तास अगोदर संभाव्य पूर-प्रवण क्षेत्रांना सतर्कतेचा इशारा देण्यास सक्षम आहे. तसेच या प्रणालीमार्फत संभाव्य पूरप्रवण क्षेत्रे, पुराच्या पाण्याची संभाव्य उंची, सर्व २४ विभागीय क्षेत्रांमधील स्थाननिहाय समस्या आणि पुराच्या संपर्कात येणाऱ्या घटकांची असुरक्षितता आणि जोखीम यांची माहिती प्राप्त होणार आहे.

प्रणालीचा प्राथमिक स्त्रोत पावसाचे प्रमाण आहे, या प्रणालीमार्फत शहरात उद्भवणाऱ्या पूरपरिस्थितीच्या मूल्यांकनासाठी समुद्रास असणारी दैनंदिन भरती तसेच ४.५ मीटर पेक्षा जास्त उंचीच्या लाटांची भरती विचारात घेण्यात आलेली आहे. उपरोक्त नमूद प्रणाली तयार करण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून संशोधकांनी याकरिता शहरातील पर्जन्यमान, पाणी वाहून नेण्याची क्षमता, स्थलाकृतिक, जमिनीचा वापर, पायाभूत सुविधांचा विकास, लोकसंख्या, तलाव, खाड्या आणि नदी-नाल्यातील नुसत्या पाण्याची माहिती याबाबतचा अभ्यास केला आहे. यामध्ये मिठी, दहिसर, ओशिवरा, पोईसर आणि उल्हास या नद्यांचा समावेश आहे. शहरातील पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांची क्षमता लक्षात घेऊन पूरस्थितीचा अंदाज वर्तविण्याची तरतूद या प्रणालीमध्ये आहे. या प्रणालीमध्ये अनुक्रमे Data Assimilation, Flood, Inundation, Vulnerability, Risk, Dissemination Module and Decision Support System ही सात मॉड्युल्स समाविष्ट आहेतया प्रणालीमध्ये नॅशनल सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर फोरकास्टिंग (NCMRWF), भारतीय हवामान विभाग (IMD), भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (IITM), BMC आणि IMD द्वारे स्थापित पर्जन्यमापक स्थानकांच्या नेटवर्कमधील माहितीचा समावेश करण्यात आला आहे. नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाशी संपर्क साधावयाचा असल्यास त्यांनी -१९१६ मदतसेवा क्रमांक संकेतस्थळ –. dm.mcgm.gov.in मोबाईल अॅप या माध्यमांचा वापर करावा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -