लंडन (वृत्तसंस्था) : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात स्लो ओव्हर रेटचा फटका भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना बसला. आयसीसीने या दोन्ही संघांना दंड लावला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमधील डब्ल्यूटीसीचा अंतिम सामना रविवारी संपला. ऑस्ट्रेलियाने भारतावर २०९ धावांनी विजय मिळवत जेतेपदाचा चषक उंचावला. या सामन्यात दोन्ही संघांना स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला आहे. भारतीय संघाला मॅच फीच्या १०० टक्के आणि ऑस्ट्रेलियन संघाला मॅच फीच्या ८० टक्के दंड आयसीसीने ठोठावला. भारताने निर्धारित वेळेत ५ षटके कमी टाकली, तर ऑस्ट्रेलियाने ४ षटके कमी टाकली होती. तसेच पंचांच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केल्याबद्दल शुभमन गिलला त्याच्या मॅच फीच्या १५ टक्के दंड लावला.