जीवीतहानी नाही, काही प्रवासी किरकोळ जखमी
दिंडोरी: नाशिक-दिंडोरी-वणी मार्गावर रणतळेजवळ बस सह तीन वाहनांमध्ये अपघात झाला असून अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र बस व वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर चार ते पाच प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
दिंडोरीकडून नाशिककडे जाणारी बस (क्रमांक- MH40N9432) रणतळेजवळ चढाव चढत असतांना समोरुन भरधाव वेगाने येत असलेल्या बोलेरो (क्रमांक-MH15BC6226) वाहनास धडकल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली. तसेच बसच्या मागे असलेली अल्टोटो कार (क्रमांक-MH05CA149) ही बसला मागून धडकली. यामध्ये बोलेरोच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले असल्याचे समजते. तर, बसमध्ये एकुण ३४ प्रवासी प्रवासी होते.
दरम्यान, नाशिक-दिंडोरी-वणी या मार्गावर होणारे सततचे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.