Wednesday, January 14, 2026

समृद्धी महामार्गावर भरधाव कार दुभाजकाला धडकली, भीषण अपघातात शिर्डीचे ४ जण ठार, ४ जखमी

समृद्धी महामार्गावर भरधाव कार दुभाजकाला धडकली, भीषण अपघातात शिर्डीचे ४ जण ठार, ४ जखमी

मृतांमध्ये ३ पुरुष, एका महिलेचा समावेश

सिन्नर : समृद्धी महामार्गाने शिर्डीला परतत असताना सिन्नरजवळील खंबाळे शिवारात भरधाव कार दुभाजकाला धडकून झालेल्या भीषण अपघातात शिर्डी येथील चार जण ठार तर चार जण जबर जखमी झाले आहेत. रविवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास सिन्नरच्या हद्दीत ही घटना घडली.

हज यात्रेकरूंना सोडून हे सर्वजण शिर्डीला परतत होते. इन्होवा कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भिंतीवर जावून आदळली. मृतांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. या अपघातात चौघेजण गंभीर जखमी असून त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत.

अपघातात रज्जाक अहमद शेख (वय ५५), सत्तार शेखलाल शेख (वय ६५), सुलताना सत्तार शेख‌‌ (वय ५०) हे जागीच ठार झाले.‌ तर, फैयाज दगुभाई शेख (वय ४०) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जुबेर रज्जाक शेख (वय ३५), मैरूनिसा रज्जाक शेख (वय ४५), अझर बालन शेख (वय २५) मुस्कान अजहर शेख (वय २२) हे गंभीर जखमी झाले. मयत आणि जखमी सर्व शिर्डी येथील रहिवासी असून एकमेकांचे नातलग आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >