सौराष्ट्र आणि कच या भागात ऑरेंज अलर्ट जाहीर
हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
पुणे : ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने आपला मार्ग गुजरात आणि पाकिस्तान किनारपट्टीकडे वळवला आहे. ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने मार्ग बदलल्याने हे चक्रीवादळ आता गुजरात आणि पाकिस्तानच्या किनारपट्टीवर धडकणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ आणखी १० दिवस लांबणार असल्याचीही शक्यता आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ पूर्व मध्य अरबी समुद्रावर ११ जून रोजी रात्री साडेअकरा वाजता अक्षांश १८.९N आणि लांब ६७.७E जवळ होते. हे चक्रीवादळ १५ जूनच्या दुपारपर्यंत मांडवी (गुजरात) आणि कराची (पाकिस्तान) दरम्यान धडकण्याची शक्यता हवामान विभागाने ट्टिटद्वारे दिली होती.
Cyclone Alert for Saurashtra & Kutch Coast: Orange Message. ESCS BIPARJPY at 0530IST of today over eastcentral & adjoining NE Arabian Sea near lat 19.2N & long 67.7E, about 380km SSW of Devbhumi Dwarka. To cross near Jakhau Port,Gujarat by noon of 15June. https://t.co/KLRdEFGKQj pic.twitter.com/bxn44UUVhD
— India Meteorological Department (@Indiametdept) June 12, 2023
आज सोमवारी सकाळी साडेपाच वाजता हे चक्रीवादळ अक्षांश १९.२N आणि लांब ६७.७E जवळ होते. यामुळे ते १५ जून रोजी दुपारी गुजरातमधील जकाऊ पोर्ट येथे धडकणार असल्याने हवामान विभागाने सौराष्ट्र आणि कच या भागात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे.
काही दिवसांपासून ग्लोबल वार्मिंगमुळे अरबी समुद्रावरील चक्रीवादळ वारंवार रौद्र रुप धारण करीत असल्याचे हवामान तज्ज्ञांसमोर आले होते. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे १० दिवसानंतर ६ जून रोजी चक्रीवादळात रुपांतर झाले. हे चक्रीवादळ मोखा चक्रीवादळानंतरचे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असून ते अलीकडच्या दशकात भारतावर प्रभाव टाकणारे आणि सर्वात दीर्घकाळ टिकणारे चक्रीवादळ ठरणार असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून मिळाली. हे चक्रीवादळ मोखा चक्रीवादळानंतरचे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असल्याचे बोलले जात आहे.