मुंबई: बिपरजॉय चक्रीवादळाने तीव्र स्वरुप धारण केले असतानाच जुहू चौपाटीजवळील समुद्रात ६ जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात २ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर, ४ जण अद्यापही बेपत्ता आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली.
आज सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच महापालिका, अग्निशमन पोलीस आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशमन आणि नौदलाकडून चौघांचा शोध सुरू आहे.