क्राइम : अॅड. रिया करंजकर
रोझी ही इंग्लिश माध्यमाच्या शाळेतून निवृत्त झालेली शिक्षिका, पती अँथनी हा छोटसं दुकान चालवून आपलं व आपल्या दोन मुलींचा उदरनिर्वाह करत होते. रोझीने सुरुवातीपासूनच हालअपेष्टा काढत संसार उभा केलेला होता. निवृत्त झाल्यानंतर तिला पीएफ व शाळेतून ठरावीक रक्कम मिळालेली होती आणि त्याच वेळी अँथोनीच्या एका मित्राला गोव्याला रूम विकायचा होता. ॲलेक्स व अँथोनी यांची फार जुनी अशी ओळखही नव्हती. चर्चमध्ये जात असल्यामुळे ते एकमेकांना ओळखत होते. त्यावेळी अँथोनीला वाटलं की, रोझीचे अमाऊंट मिळालेले आहे ते कुठेतरी गुंतवणूक केले, तर आपल्यालाही उद्या घर भाड्याने दिल्यावर इन्कम मिळेल. असा विचार अँथोनीने केला व हा विचार त्याने रोझी हिला सांगितला.
रोझी हिने सुरुवातीपासून आपल्या पतीला असा व्यवहार करण्यापासून नकार देत होती. कारण, आपण मुंबईला राहतो आणि गोव्याला रूम घ्यायचा आणि तिकडे लक्ष देत राहायचं हे जमणार नव्हतं, असं तिचं म्हणणं होतं. अँथोनी रूम घेण्यासाठी हट्टाला पेटला. कारण ॲलेक्स रूमबद्दल सतत अँथोनीला विचारत होता. “रूम चांगला आहे, घे हातातून गेला तसा रूम मिळणार नाही” असा तो ब्रेनवॉश अँथोनीचा करत असायचा. शेवटी रोझीने या गोष्टीला वैतागून आपल्या नवऱ्याला अकरा लाख रुपये दिले आणि रूम बुक करायला सांगितला. ती रक्कम चार चेकमध्ये विभागून ॲलेक्स याला देण्यात आली व तशी कागदपत्रेही बनवण्यात आली. रूमची किंमत १३ लाख अशी ठरली गेली होती आणि अकरा लाख पूर्ण केले होते आणि शेवटचे फक्त दोन लाख बाकी होते. अकरा लाख मिळाल्यानंतर अँथनी यांना ॲलेक्स सतत टाळू लागला. अँथनी रूमबद्दल विचारायचे त्यांना उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागला. अँथनी ॲलेक्सला ‘आमच्या ताब्यात रूम दे’ असं म्हणाले, तेव्हा ॲलेक्स बोलू लागला की, ‘बाकीचे उरलेले २ लाख रुपये द्या’ मग तुमच्या ताब्यात देतो. त्याशिवाय रूम ताब्यात देणार नाही, असं तो बोलू लागला. अँथनी बोलू लागला, “अरे आम्ही रूम न बघता आम्ही तुझा रूम बुक केलेला आहे. एवढा तरी विश्वास आमच्यावर ठेव” आणि सतत अलेक्स अँथोनी यांच्याशी बोलायला आणि भेटायला टाळू लागला. या टेन्शनमुळे एक दिवस अँथनी यांना ॲटॅक आला आणि त्या ॲटॅकमध्ये अँथनी यांचे निधन झालं. रोझी यांना अँथनी आणि ॲलेक्समध्ये झालेल्या व्यवहाराबद्दल माहिती होती.
आपल्या पतीच्या निधनानंतर ती हा व्यवहार बघू लागली आणि रूमसाठी ॲलेक्स मागे लागली. ‘रूमचे पेपर दे’ असं रोझी यांनी ॲलेक्सला सांगितले. ॲलेक्सने रूमचे जुने पेपर आणि बिल्डिंगचा फोटो आणून रोझी यांना दिला. त्यावेळी ते पेपर बघितल्यावर ते सर्व पेपर रिसॉर्टचे होते याची कल्पना रोझी यांना आली. प्रत्येक पेपरच्या रूम नंबरवर खाडाखोड केलेली रोझी यांना दिसली. म्हणून त्या पत्त्यावर रोझी यांनी गोव्याला जाण्याचा ठरवलं आणि तिथे गेल्यावर त्यांना कळालं की, ॲलेक्स यांनी दिलेले पेपर हे खरोखर रिसॉर्टचे असून ते रिसॉर्ट हे तिथे येणाऱ्या गेस्टसाठी भाड्याने दिलं जातं. त्या रिसॉर्टमधले रूम हे राहण्यासाठी नाहीयेत कारण, त्या रिसॉर्टमध्ये फक्त एकच रूम अशा पद्धतीची रूमची बांधणी आहे. ना किचन आहे, ना बेडरूम आहे, नाही हॉल आहे. म्हणजे ॲलेक्स याने अँथोनी यांची सरळ सरळ फसवणूक केली होती आणि ज्यावेळी रोझी आणि सगळे पेपर मागितले, त्यावेळी त्यांनी रिसॉर्टचे पेपर त्यांना दिले आणि तुमच्या पतीने रिसॉर्टमधला रूम बुक केलेला होता, असं सांगितलं. रोझी यांचं असं म्हणणं होतं की, गोव्याला आम्हाला राहण्यासाठी घर घ्यायचं होतं, तर माझा नवरा रिसॉर्टमधला रूम बुक का करेल आणि सर्व कागदपत्रे रोझी यांनी एका वकिलाला दाखवली, त्यावेळी कळलं की, रिसॉर्टची जागा जी आहे, ती जागा ॲलेक्स आणि त्याच्या परिवाराने एका बिल्डरला विकलेली होती. बिल्डरने ते रिसॉर्ट बांधलेलं होतं. ॲलेक्स हा रूम माझा आहे, असा बोलत होता, त्या रूमबद्दल व्यवहार पूर्ण न केल्यामुळे बिल्डर आणि ॲलेक्स यांच्यामधील डील कॅन्सल झालेली होती. त्याचाच अर्थ तो अँथोनीला जो रूम विकत होता तो मुळात ॲलेक्सचा नव्हताच.
अलेक्सने अँथोनीला वन बीएचके देतो असं सांगून रिसॉर्टची कागदपत्रे दाखवून सरासर फसवणूक केलेली होती. त्यामुळे रोझी यांनी पोलीस कम्प्लेंट केल्यानंतर उलट ॲलेक्स यांनी रोझीला नोटीस पाठवली की, माझे दोन लाख रुपये आहेत ते व्याजासकट पूर्ण करा. रोझी आणि अँथोनी यांची फसवणूक करून ॲलेक्स थांबलेला नाहीच, तर वर दोन लाख व्याजासकट मागतोय. त्याच्यानंतर रोझी यांना गोव्याला घेऊन ॲलेक्स गेला आणि तिथे तिथल्या वकिलाकडे मी एक महिन्यांमध्ये अकरा लाख पूर्ण करतो, असं त्याने प्रतिज्ञापत्र बनवून दिले. पण त्या प्रतिज्ञापत्रात जी तारीख टाकलेली होती, ती तारीख उलटून गेली तरी ॲलेक्स यांनी रोझी यांचे पैसे परत केले नाहीत. इथे अकरा लाख रोझी यांचे अडकले आहेत आणि उलटे अँथनी अजून दोन लाख मला द्या आणि ती व्याजासकट द्या, असं सांगत आहे.
सगळी कागदपत्रे बघून चेकवरील अमाऊंट ॲलेक्स यांनी काढलेली आहे. या सगळ्या गोष्टीचा तपासून बघितल्यानंतर रोझी यांच्या वकिलाने न्यायालयात जाऊन दाद मागण्यास त्यांना सांगितलेले आहे. रोझी यांनी आपला आयुष्य कष्टमय असे काढलेले आहे. जी सर्व्हिस मिळाली, ती त्यांच्या पतीने रूममध्ये गुंतवली आणि ॲलेक्स जाने ती रक्कम घेऊन रोझी आणि त्यांच्या पतीची फसवणूक केली. रोझी यांच्या आयुष्याची कमाई ॲलेक्स याने अशा प्रकारे फसवणूक करून घेतली. वन बीएचके रेसिडेन्शियल एरिया देतो सांगून रिसॉर्टच्या रूमची कागदपत्रे रोझी यांच्या हातात दिली.
(सत्यघटनेवर आधारित)