Saturday, July 13, 2024
Homeदेशपायलट विरुद्ध गेहलोत यांच्यातील वाद चव्हाट्यावर, पायलट नवा पक्ष स्थापन करणार?

पायलट विरुद्ध गेहलोत यांच्यातील वाद चव्हाट्यावर, पायलट नवा पक्ष स्थापन करणार?

भंडाना: आज सचिन पायलट (Sachin Pilot) यांचे वडील राजेश पायलट यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्त राजस्थानातील भंडाना येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत पायलट यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार प्रहार केले. पायलट म्हणाले, जर आम्ही गरीब लोकांची मदत करायला गेलो तर केंद्रातील नेते म्हणतात अशाने तिजोरीने खडखडाट होईल येथील लोक म्हणतात युवकांची मदत केली तर मानसिक दिवाळखोरी ठरेल. जर आम्ही काही मागणी करत असू तर ती फक्त नागरिकांसाठीच आहे. त्यामुळे पायलट विरुद्ध गेहलोत हा वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. त्यातच आज म्हणजेच ११ जून रोजी पायलट नव्या पक्षाची घोषणा करतील अशी चर्चा राजस्थानच्या राजकारणात सुरू आहेत.

दरम्यान, हा वाद मिटवण्याचे प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाने मध्यंतरी केले होते. मात्र, हे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. कारण, सचिन पायलट अजूनही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर पायलट नवा राजकीय पक्ष स्थापन करू शकतात अशीही चर्चा आहे. मात्र, काँग्रसचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी या चर्चा निव्वळ अफवा असल्याचे म्हटले आहे.

वेणुगोपाल म्हणाले, आम्ही सचिन पायलट यांच्या संपर्कात आहोत. दिल्ली येथील बैठकीनंतर तीन ते चार वेळेस पायलट यांच्याबरोबर बोलणे झाले आहे. राजस्थानात अशा प्रकारे कोणत्याच हालचाली सुरू नाहीत. आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस एकत्रितपणे लढणार असल्याचा दावा त्यांनी केला.

पायलट काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष?

तोंडावर आलेल्या निवडणुका लक्षात घेता काँग्रेस हा वाद लवकरात लवकर मिटविण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे पायलट मात्र मागे हटण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत नेतृत्वाचे असे प्रयत्न आहेत की कोणत्याही परिस्थितीत पायलट यांना राजी करायचे. यासाठी एक फॉर्म्युलाही तयार करण्यात आला आहे. पायलट यांना राजस्थान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष बनविण्याचा काँग्रेसचा विचार आहे. काँग्रेसने यासाठी तयारी पूर्ण केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -