Sunday, March 23, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘गुलाम बेगम बादशाह’चा १२ जूनला डिजिटल प्रीमिअर

‘गुलाम बेगम बादशाह’चा १२ जूनला डिजिटल प्रीमिअर

ऐकलंत का! : दीपक परब

भरत जाधव, नेहा पेंडसे, संजय नार्वेकरचा उत्कंठावर्धक खेळ!

अल्ट्रा झकास, ओटीटी मराठी प्लॅटफॉर्मवर सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट, नाटक, बायोग्राफी प्रदर्शित होत असतात. कुलस्वामिनी, बोल हरी बोल, अदृश्य, अथिरन यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटानंतर अल्ट्रा झकास ओटीटी मराठी आता प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे एक नवा सस्पेन्स थ्रीलर चित्रपट ‘गुलाम बेगम बादशाह’. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्लॅटफॉर्मवर लॉन्च झाला आहे.

‘गुलाम बेगम बादशाह’ चित्रपटाची कथा ३ मित्रांच्या विक्रम (भरत जाधव), समीर (संजय नार्वेकर) आणि लोरा (नेहा पेंडसे) यांच्याभोवती फिरते. लोरा स्ट्रगलिंग आणि नवीन अभिनेत्री असते, तर विक्रम पॅथॉलॉजी लॅबमध्ये काम करतो आणि समीर हा नामांकित वृत्तपत्राचा पत्रकार असतो. परिस्थिती बिकट असल्यामुळे या तिघांनाही चांगले पैसे कमवायचे असतात. आर्थिक भार कमी करण्यासाठी तिघेही विविध मार्ग शोधणं सुरू करतात. तथापि, कथेत पुजारीच्या येण्याने अनपेक्षित ट्विस्ट येतो. तो खरोखर पुजारी आहे की एक रहस्यमय अनोळखी व्यक्ती? विक्रम, समीर, लोराच्या आयुष्यात नक्की काय उलथापालथ होते? तिघांना पैसे कमवण्यासाठी मार्ग मिळतो की नाही? मार्ग शोधता शोधता त्या तिघांमधील मैत्रीवर त्याचा काय परिणाम होतो का? यासाठी मात्र तुम्हाला चित्रपट पाहायला लागेल.

‘गुलाम बेगम बादशाह’ हा मैत्री, रहस्य आणि नशिबाचा पाठलाग करत चित्रपटातील गूढ कथा कशी उलगडून दाखवते, यासाठी येत्या १२ जूनला अल्ट्रा झकास ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित होत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -