Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडी'महाराष्ट्र भवन' उभारण्यासाठी श्रीनगरमध्ये जागा मिळावी

‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी श्रीनगरमध्ये जागा मिळावी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जम्मू-काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नरांकडे मागणी

श्रीनगर (वृत्तसंस्था) : श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत, या दरम्यान त्यांनी श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची भेट घेतली आणि महाराष्ट्र भवनासाठी श्रीनगरमध्ये जागा मिळावी, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

जम्मू-काश्मीरमध्ये आता अनेक गोष्टी बदलल्या आहेत आणि महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पर्यटक जम्म-काश्मीरला येत असतात. महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांसाठी महाराष्ट भवन हा पर्याय असेल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जम्मृ-काश्मीरच्या लेफ्टनंट गव्हर्नर सिन्हा यांना मुख्यमंत्री शिंदें यांनी त्याबद्दलचे पत्र दिले. पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की, पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन सांस्कृतिक देवाण-घेवाण वाढवणे आणि पर्यायाने आर्थिक विकास करणे, यासाठी महाराष्ट्र भवनाला जागा मिळाल्यास दोन्ही राज्यांना त्याचा फायदा होईल. श्रीनगरमधील हे महाराष्ट्र भवन केवळ पर्यटकांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देणारे राहणार नाही, तर या ठिकाणी महाराष्ट्राची समृध्द कला, खाद्य आणि संस्कृतीची झलक देखील पाहता येऊ शकेल. जम्मू आणि काश्मीर समवेत नाते अधिक दृढ करण्यासाठी या महाराष्ट्र भवनाचा उपयोग विद्यार्थी, उद्योजक, वरिष्ठ अधिकारी यांना एक प्रमुख केंद्र म्हणून करता येईल. महाराष्ट्र भवनसाठी योग्य ती जागा मिळाल्यास काश्मीरची संस्कृती, पर्यावरण लक्षात घेऊन एक चांगले भवन या ठिकाणी राज्य सरकारतर्फे बांधण्याची ग्वाही देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या पत्रात केली आहे

जम्मू-काश्मीरनंतर मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा

मुख्यमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा १३ जून रोजी निश्चित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मंगळवारी तपोवन मैदानात जाहीर सभा होणार आहे, याबाबतची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. शासन आपल्या दारी कार्यक्रम कोल्हापुरात येत्या १३ जूनला होणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच काही मंत्री यात उपस्थित राहणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -