नंदुरबार: सोशल मीडीयावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने नंदुरबार शहरातील एका युवकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहरातील भोणे फाटा भागातील ही घटना असून येथील एका तरुणाने त्याच्या व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवला होता. राज्यात घडणाऱ्या संवेदनशील घटनांच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले.
राज्यात चालंलय काय? बीडमध्येही औरंगजेबाच्या स्टेटसनंतर आष्टी बंद
दरम्यान, नंदुरबार पोलिसांनी सोशल मिडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवून सार्वजनिक शांतता भंग करण्याऱ्या विरोधात कडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. तसेच कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेऊन सार्वजनिक शांतता भंग करु नये असे आवाहन नागरिकांना केले आहे.