Monday, July 8, 2024
Homeताज्या घडामोडीपरभणीत मानवतेला काळीमा फासणारी घटना!

परभणीत मानवतेला काळीमा फासणारी घटना!

जिहादी मानसिकता असलेल्या व्यक्तींकडून भटके विमुक्त अल्पसंख्यांक शिख सिकलकर समाजातील तीन अल्पवयीन मुलांना क्रुर अमानुष मारहाण; मारहाणीत एकाचा मृत्यू, भटके विमुक्तांमध्ये आक्रोश

परभणी : परभणी येथील अल्पसंख्यांक शिख सिकलकर समाजातील तीन अल्यवयीन बालक नेहमीप्रमाणे मध्यरात्रीचे सुमारास परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उखळद नयागढ मार्गावरून पिंपरी देशमुख या गावाहुन वराह-डुकरे पकडण्यासाठी हातात जाळी व इतर साहित्य घेऊन परत येत असतांना उखळद येथे विशिष्ट समुदायातील काही लोकांनी त्यांना अडवले व काहीही विचारपुस न करता चोर चोर असे ओरडून जमाव जमा केला व या भटके विमुक्त अल्पसंख्यांक शिख सिकलीकर समाजातील १४ ते १६ वर्षाच्या तीन मुलांना चोरीच्या संशयावरून अतिशय अमानवी क्रूरतेने जबर मारहाण केली. पिडीत मुले भटके विमुक्त प्रवर्गातील शिख शिकलकरी ‘अल्पसंख्यांक शीख’ या समाजाचे असल्याने या विशिष्ट समुदायाच्या जमावाने त्यांच्या डोक्यावरील पवित्र पगड़ी (दस्तार) हटवून केसांच्या झिंझ्या ओढून उपटुन मारहाण केली. त्यांचे हातपाय दोरीने बांधुन त्यांना क्रूरपणे डोके, पोट व चेहऱ्यावर पायातील बुटांनी मारहाण केली तसेच स्टील रॉडने पण अमानुष क्रूरपणे मारहाण केली. त्यात १४ वर्षीय किरपालसिंग भोंड या मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याउपरही दोन्ही अल्पवयीन मुलांना मारहाण सुरूच होती. यात गोरसिंग दुधानी व अरुणसिंग टाक या दोघांवरती परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलीस घटनास्थळी पोहचल्यावरही या समुदायाने त्यांच्याशी पण बाचाबाची व अरेरावी केली. ही घटना अतिशय गंभीर आणि संवेदनशील आहे.

या घटनेची माहिती मिळताच भटके विमुक्त विकास परिषदेचे जिल्हा संयोजक गोविंद भंडे यांनी घटनास्थळी भेट घेतली. परिषदचे कार्यवाह नरसिंग झरे, शरद दिवे, गोविंद भंडेव अन्य कार्यकर्ते यांनी पिडीत कुटुंबांची भेट घेतली. त्यावेळी मृतक किरपालसिंगच्या आईने ज्या भावना व्यक्त केल्या त्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या आहेत.

त्या म्हणाल्या, माझ्या मुलाचा ज्या निघृर्णतेने खुन करण्यात आला त्याला न्याय मिळेपर्यंत मी शांत बसणार नाही. अन्य हिंदु समाजबांधव माझ्या पाठीशी कायम राहतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

यावेळी भटके विमुक्त विकास परिषद व अन्य भटके विमुक्त समाज या पिडीत कुटुंबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल, अशी ग्वाही नरसिंग झरे व अन्य कार्यकर्त्यानी त्यांना दिली.

या घटनेकडे “मॉब लीचींग” या दृष्टीकोनातून बघितले पाहिजे व या घटनेतील सर्व आरोपींना “मोक्का” व “कलम २९५ अ” कायद्यांतर्गत तत्काळ अटक करून सदर संवेदनशील घटनेची सखोल चौकशी जलदगती न्यायालय नेमून योग्य ती बाजू मांडून पिडीत कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा. या प्रकरणात पोलिसांची भुमिका पण संदिग्ध वाटत आहे. गुन्हेगारांना वाचविण्याचा तर प्रयत्न होत नाही ना, अशी शंका वाटत आहे. आतापर्यंत या प्रकरणात उखळदचे माजी सरपंच अक्रम पटेलसह सात जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये सय्यद एजाज सय्यद इब्राहिम, एकनाथ सटवाजी कुंभारकर, सय्यद अकरम सय्यद अगामिया, सय्यद तोहिद सय्यद संमदर, सय्यद फजलू सय्यद अली, शेख जावेद शेख पिरमिया, रामा बाबाराव जुमडे, पाशा खान उर्फ बाबाखान पि. अफजल खान यांचा समावेश आहे.

अजुनही काही गुन्हेगार फरार आहेत. त्यांचा तातडीने शोध घेऊन अटक करण्यात यावी. पिडीत तिन्ही कुटुंब गरीब आहेत व रस्त्याच्या कडेला झोपड्यात राहणारे आहेत. सरकारने पिडीत कुटुंबियांना तात्काळ भरीव आर्थिक मदत मिळावी, त्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास सरकारी नोकरी व अरुणसिंग टाक, गोरासिंग दुधानी यांच्या परिवाराला १५ लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी “भटके विमुक्त विकास परिषद, महाराष्ट्र प्रांत” ने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र शासन तसेच केंद्रीय अल्पसंख्यांक आयोग, महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -