तब्बल ४०० कोटी रुपयांच्या घोट्याळ्याचा आरोप
नवी दिल्ली: इडीने एम३एमचे प्रमोटर रूप बन्सल (Roop Bansal) यांना अटक केली आहे. गुंतवणूकदार आणि फ्लॅट खरेदीदारांची फसवणूक आणि ४०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंगच्या (Money laundering) आरोपाखाली ही अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी गुरुग्राममध्ये ईडीने आयआरईओ आणि एम3एम ग्रुपच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. तपासात एजन्सीला कळले की एम3एम ग्रुपने गुरुग्राममधील ४ कोटी किमतीच्या जमिनीचे हक्क बनावट पाच कंपन्या तयार करुन त्यांना १० कोटींना विकले. या पाच कंपन्यांनी ४ कोटी किमतीच्या जमिनीचे हक्क आयआरईओ ग्रुपला ४०० कोटींना विकले, म्हणजेच ४०० पट अधिक किमतीत हा करार करण्यात आला.
या प्रकरणी ईडीने नोव्हेंबर २०२१ मध्ये आयरिओ ग्रुपचे संचालक ललित गोयल यांनाही अटक केली होती, जे सध्या तुरुंगात आहे.