Friday, June 20, 2025

अभिमानास्पद! एसटीची धूरा आता महिलांच्या हातात!

अभिमानास्पद! एसटीची धूरा आता महिलांच्या हातात!

पहिल्यांदाच, सासवड-जेजुरी मार्गावर महिलेने चालवली बस


पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसची धूरा आता महिलांच्या हातात देण्यात आली असून इतिहासामध्ये पहिल्यांदा एका महिलेने सासवड ते नीरा मार्गावर बस चालविली. अर्चना अत्राम असे पहिल्या एसटी बस चालकाचे नाव आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे) या मार्गावर गुरूवारी बस चालविली.


एसटी महामंडळामध्ये महिला वाहक म्हणून काम करतात. पण, अद्यापर्यंत महिला चालक एसटी महामंडळात नव्हत्या.


अत्राम यांनी बस चालविल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. याबद्दल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ट्टिवट करून अत्राम यांचे अभिनंदन केले.


चाकणकर आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'नवी जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची... आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक मा. अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला आहे. त्यांनी सासवड ते नीरा दरम्यान जेजुरी मार्गे बस चालवली. राज्य महिला आयोगाच्या वतीने पहिल्या एसटी महिला चालक मा. अर्चना आत्राम यांचे मनःपूर्वक अभिनंदन.'

Comments
Add Comment