Sunday, July 6, 2025

जितेंद्र आव्हाडांची पातळी घसरली, चित्रा वाघ यांच्यावर केली आक्षेपार्ह टीका

जितेंद्र आव्हाडांची पातळी घसरली, चित्रा वाघ यांच्यावर केली आक्षेपार्ह टीका

मुंबई: सध्या राजकारण्यांची टीका करण्याची पातळी घसरली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचाच प्रत्यय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या सुरू असलेल्या ट्विटर युद्धावरुन दिसून आला. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी चित्रा वाघ यांच्यावर केलेल्या खालच्या पातळीवरील टीकेनंतर चित्रा वाघ यांनी देखील याला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेताना आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यावर भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी टीका केली होती. अशा व्यक्तींना वेळीच आवर घाला असे त्या म्हणाल्या होत्या. यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आवड यांनी मात्र आपली पातळी सोडली. त्यांनी 'हमाम में सब नंगे है'...... आणि 'अँटी चेंबरमधील विनोद' असे म्हणत चित्र वाघ यांच्यावर टीका केली. तर याला चित्रा वाघ यांनी देखील प्रत्युत्तर देत म्हटले की, 'उत्तर नसतं तेव्हा स्त्रीची बदनामी हे तुमचा शस्त्र असतं' असा हल्ला चढवला आहे.






Comments
Add Comment