Thursday, May 8, 2025

क्रीडाताज्या घडामोडी

टीम इंडियावर फॉलोऑनचे संकट, भारत ३१८ धावांनी पिछाडीवर

टीम इंडियावर फॉलोऑनचे संकट, भारत ३१८ धावांनी पिछाडीवर

लंडन : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लंडनच्या ओव्हल मैदानावर डब्लूटीसीचा फायनल सामना खेळला जात आहे. टीम इंडियाची दुसऱ्या दिवसअखेर पाच बाद १५१ अशी घसरगुंडी उडाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी अजिंक्य रहाणे २९ धावांवर आणि श्रीकर भरत ५ धावांवर खेळत होते.


या सामन्यात प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा संघ ऑलआऊट झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने पाच विकेट्सच्या मोबदल्यात १५१ केल्या आहेत. अजिक्य रहाणे (२९ धावा) आणि एस श्रीकांत पाच धावा करून नाबाद आहेत. भारत ३१८ धावांनी पिछाडीवर आहे.


भारताला फॉलोऑनची नामुष्की टाळण्यासाठी किमान २७० धावांची मजल मारण्याची गरज आहे. त्यासाठी टीम इंडियाला अजूनही ११९ धावांची आवश्यकता आहे.


या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्स गमावून ३२७ धावा केल्या. प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या ऑस्ट्रेलियाचा संघाचा पहिला डाव दुस-या दिवशी ४६९ धावांवर संपुष्टात आला.


रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना चांगली सुरुवात देता आली नाही. त्यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीही स्वस्तात तंबूत परतले. झटपट ४ विकेट गमावल्यामुळे टीम इंडिया अडचीत सापडली आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी फक्त तीस धावांची सलामी दिली. रोहित शर्मा १५ धावांवर कमिन्सच्या चेंडूवर बाद झाला. तर शुभमन गिल याला १३ धावांवर बोलँड याने तंबूत पाठवले. चेतेश्वर पुजारा १४ धावांवर बाद झाला. कॅमरुन ग्रीन याने पुजाराचा अडथळा दूर केला. विराट कोहलीला स्टार्कने बाद केले. विराट कोहली १४ धावांवर बाद झाला.


टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज तंबूत परतल्यानंतर रविंद्र जाडेजा याने आक्रमक फलंदाजी केली. जाडेजाने चौफेर फटकेबाजी करत भारताचा डाव सावरला. अजिंक्य रहाणे याने संयमी फलंदाजी करत जाडेजाला चांगली साथ दिली. रविंद्र जाडेजा आणि अजिंक्य रहाणे यांनी पाचव्या विकेटसाठी ७१ धावांची भागिदारी केली. तर जाडेजाने ४८ धावांची खेळी केली. त्याने सात चौकार आणि एक षटकार लगावत ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी फोडून काढली. दुसरीकडे अजिंक्य रहाणे याने संयमी फलंदाजी केली.

Comments
Add Comment