बंगळुरू : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची कन्या परकला वांगमयीचा विवाह बंगळुरू येथील घरात गुरुवारी (८ जून) पार पडला. या छोटेखानी लग्नसोहळ्यातील काही फोटो समोर आले आहेत. परकला वांगमयीचे लग्न बंगळुरूत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पडले. ज्यामध्ये फक्त कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होते.
निर्मला सीतारामन यांची कन्या परकला वांगमयीच्या पतीचे नाव प्रतीक आहे. अर्थमंत्र्यांच्या मुलीचा विवाह ब्राह्मण परंपरेनुसार आणि उडुपी अदमारू मठाच्या संतांच्या आशीर्वादाने पार पडला. या विवाह सोहळ्यात राजकीय नेतेमंडळी दिसले नाहीत. यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले. सोशल मीडियावर युजर्स निर्मला सीतारमण यांचे कौतुकही करत आहेत.
दरम्यान, परकला वांगमयी या व्यवसायाने मल्टीमीडिया पत्रकार आहेत. त्यांनी नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी, बोस्टन, मॅसॅच्युसेट्स येथून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात बीएम आणि एमए केलं आहे. आतापर्यंत त्यांनी लाइव्ह मिंट, द व्हॉईस ऑफ फॅशन आणि द हिंदू सारख्या संस्थांसोबत काम केले आहे.