चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले प्रत्युत्तर
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत या धमक्यांसाठी भाजपला जबाबदार ठरवत असतानाच ‘धमकी देणे हे आमच्या रक्तात नाही’ असे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात ते माध्यमांशी बोलत होते.
ते म्हणाले की, ‘धमकी देणे हे आमच्या रक्तात नाही, ज्याने कोणी धमकी दिली असेल त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. तो राष्ट्रवादीचा असो, भाजपचा असो किंवा काँग्रेसचा असो, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी.’