Monday, June 30, 2025

फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने एका तरुणाविरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याने एका तरुणाविरोधात घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

घोटी शहरातून पोलीसांचा रुट मार्च


इगतपुरी : इगतपुरी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या घोटी येथील एका तरुणाला फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकणं महागात पडलं आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकल्याबद्दल एका तरुणावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घोटीमध्ये सुधानगर येथे वास्तव्यास असलेल्या या तरुणाचे नाव शोएब मणियार असे आहे. पोलीस कॉन्स्टेबल निलेश विलास साळवे यांच्या फिर्यादी वरून घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी घोटी येथे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. घोटी पोलीस ठाण्याबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मात्र घोटी आणि इगतपुरी पोलिसांनी कुठलाही अनुचित प्रकार होऊ न देता परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.


या घटनेनंतर घोटी शहरातून पोलीसांनी रूट मार्च काढत नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या आपत्तीजनक पोस्ट करु नयेत व अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांनी केले आहे.

Comments
Add Comment