-
अरुण बेतकेकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका सरकारच्या निमंत्रणानुसार राज्य अतिथी म्हणून दि. २१ ते २४ जून २०२३ दरम्यान अमेरिकेला रवाना होत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा १२ दिवसांचा अमेरिका दौरा सध्या सुरू आहे. या दरम्यान ते सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया आणि अंतिमतः न्यूयॉर्कस्थित जॅव्हिट्स गार्डन येथे सुमारे ५००० प्रवासी भारतीयांसमोर त्यांची जाहीर सभा होईल. या सभेस ‘मोहब्बत की दुकान’ असे गोंडस नाव देण्यात आले आहे. असे असले तरी या मागील एकमेव छुपा उद्देश हा भारत, भाजप सरकार आणि मोदी यांच्याविरुद्ध वातावरण गढूळ करणे हाच आहे. तेथील विरोधी मीडिया, सोशल मीडिया, संस्था, संघटना, एनजीओ यांचा पुरेपूर वापर होत आहे. राहुल गांधी यांचा दौरा यशस्वितेसाठी कोण-कोण गुंतले आहेत, हे ऐकल्यास आपल्या पायाखालची जमीन निसटल्यावाचून राहणार नाही. या कृत्यात जिहादी, खलिस्तानी जगभरातील भारतविरोधी मुसलमान, डावे पक्ष, फुटीरतावादी, पाकिस्तानी आय. एस. आय., अनेक एनजीओ, जॉर्ज सोरेस ही जी मंडळी जी नेहमीच भारतविरोधी कारवाईत गुंतलेली असत. तीच या मागे आहेत. या आधी २२ सप्टेंबर २०१९ रोजी पंतप्रधान मोदी व अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मेडिसन्स स्क्वेअर गार्डन, न्यूयॉर्क स्थित ‘हाऊडी मोदी’ या भूषणावह संयुक्त सभेस यांनीच ‘गो बॅक मोदी’ असे विरोधी प्रदर्शन आयोजित केले होते. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमास ठरावीक लोकांनाच निमंत्रण दिले जात आहे. जाहीर कार्यक्रम असूनही यात मोदी समर्थक नसतील याची खातरजमा केली जात आहे. यासाठी निमंत्रितांची पार्श्वभूमी त्यांच्या सोशल मीडिया, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम या माध्यमाद्वारे खंगाळली जात आहे. उद्देश एकच मोदी समर्थक येतील आणि मोदी मोदी होईल याची भीती. हा मेळावा प्रवासी भारतीयांचा वा भारत विरोधकांचा असा प्रश्न निर्माण व्हावा. राहुल गांधी हे काँग्रेसचे नेते, जे भारताचे पंतप्रधान बनण्याचे स्वप्न पाहतात. तेच अशा फुटीरतावाद्यांच्या हातातील बाहुले बनले आहेत. हे पुढील माहितीवरून अधोरेखित होईल.
राहुल गांधी यांच्या अमेरिका दौऱ्याचे आयोजक, समन्वयक कोण? गर्दी जमवण्याची जबाबदारी कोणाची? अमेरिकेत जगभरातून मुसलमान येतात. पण ते त्यांच्या देशानुसार ओळखले जात नसून केवळ मुसलमान म्हणून एकत्र राहतात. अमेरिकेतील पाकिस्तानचे दलाल, जमात-ए-इस्लामी, फुटीरतावादी, जिहादी जे अमेरिकेत राहून जगभरात इस्लामिक पंचम फडकविण्याच्या प्रयत्नात असतात. अशा कट्टर पंथियांद्वारे राहुल गांधी यांना अमेरिकेत बोलावले गेले आहे. दौऱ्यातील त्यांच्या पहिल्याच कार्यक्रमात राष्ट्रगीताचा अपमान केला गेला. एकीकडे राष्ट्रगीत सुरू होते तर समोरील प्रेक्षक जागेवर बसून होते. खाण्या-पिण्यात मश्गुल होते. या कार्यक्रमात खलिस्तानी उपस्थित होते. त्यांना त्यांचा झेंडा फडकविण्यास दिला गेला. हे निश्चितच भारतीय नव्हते. तरी राहुल गांधी या सर्व प्रकाराकडे स्मितहास्य करीत पाहत होते, नव्हे तर त्यांना प्रोत्साहन देत होते. एकही काँग्रेसीने पुढे येऊन हा प्रकार थोपविण्याचा प्रयत्न केला नाही. हा प्रकार सोशल मीडियावर आपण पाहू शकता.
अमेरिकेतील न्यूजर्सी हे राज्य न्यूयॉर्क राज्याशी रेटून आहे. केवळ हडसन नदी या दोन राज्यांना वेगळे करते. न्यूजर्सी यास प्रतिभारत असे संबोधले जाते. येथे भारतीय मोठ्या संख्येने आहेत. तसेच भारत व जगभरातील मुसलमानही मोठ्या संख्येने येथे वास्तव्यास आहेत. राहुल गांधी यांच्या न्यूयॉर्क येथील ४ जून २०२३ च्या ‘मोहब्बत की दुकान’ या कार्यक्रमाची मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी होत आहे. यासाठी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर होत आहे. इच्छुकांनी न्यूजर्सी येथे रजिस्ट्रेशन करावे, येथून बसद्वारे त्यांना कार्यक्रमस्थळी नेले जाईल. या आयोजकांची नावे, पत्ते, मोबाइल नंबर, ईमेल इत्यादींद्वारे संपर्क करण्याचे अवाहन केले गेले आहे. हे आयोजक खालीलप्रमाणे.
१) मसजिद अल्वली, नॉर्थ एडिसन, वूड ब्रिज, न्यूजर्सी. संपर्क – ताजीम अन्सारी, मसजिद मुस्लीम कम्युनिटी साऊथ एडिसन. तसेच नियाज खान हे पाकिस्तानी चट्टे-बट्टे, आयएसआयच्या
पेरोलवरील दलाल.
२) मुस्लीम सेंटर ऑफ मिडिलसेक्स कौंटी येथील इमाम अहमद रऊफ जमान.
३) इस्लामिक सोसायटी ऑफ सेंट्रल जर्सी येथील जावेद सईद, हबीब सिद्दिकी.
४) मसजिद सदर, दारुल इस्लाह येथील हाफिज इमाम, सईद कुरेशी हा पेशावरचा रहिवासी, इस्लामाबाद येथे त्याचे शिक्षण झाले. आता अमेरिकेत राहून अँटी इंडिया, अँटी कश्मीर याचा तो प्रचारप्रमुख आहे.
५) मुस्लीम सेंटर ऑफ ग्रेट प्रिन्स्टन येथील इमाम राऊफ हा काराचीचा रहिवासी
या केवळ एका न्यूजर्सीतील काही संस्था. अशा अमेरिकेतील अनेक पाकिस्तान धार्जिण्या संस्थांद्वारे राहुल गांधी यांचे कार्यक्रम राबविले जात आहेत. या संस्थेत प्रामुख्याने पाकिस्तान्यांचा राबता आहे. या ठिकाणाहून बसेस निघणार ते पाकिस्तानी लोकांना भरूनच. एका कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले, ‘भारतात मुसलमानांची हालत खूपच खराब आहे, जशी ८० च्या दशकात दलितांची होती.’ यामागील गुपित काय? तर मुसलमान आयोजकांना, समन्वयकांना खूश करणे. ही जी मुस्लीम सेंटर्स आहेत, ती सर्वतः जमात-ए-इस्लामी, मुस्लीम ब्रदरहूडशी संलग्न संस्था आहेत. यांना पैसा येथूनच पुरवला जातो. सर्व कारवाया याच जिहादी मानसिकतेद्वारे चालविल्या जातात. वरील संस्था इस्लामिक सेंटर ऑफ नॉर्थ अमेरिका (ICNA) या संस्थेशी संलग्न आहेत. वेबसाईटनुसार ICNA ही पाकिस्तानी इस्लामिक संस्था जमात-ए-इस्लामी यांच्या इशाऱ्यावर कार्यरत आहे. तिचे मुख्य ध्येय हे इस्लाम धर्माचा प्रचार व वावर विविध धर्मातील मानवाच्या जीवनात व्हावा. यांच्याद्वारे इस्लामी जिहादी वक्त्यांचे कार्यक्रम आयोजित होतात. पुस्तिका प्रकाशित होतात, ज्याद्वारे जगभर इस्लामी कायदा प्रस्तापित व्हावा याचे धडे गिरविले जातात. यांना पाकिस्तानी धर्मादाय संस्था हमास या कार्यासाठी आर्थिक मदत करीत असते. आणखी एक समन्वयक, भारत द्वेष्टा मिनाज खान हा भारतविरोधी संघटना इंडियन अमेरिकन मुस्लीम कौंसिल (IAMC) चा स्वयंघोषित नेता आहे. अव्याहतपणे भारतविरोधी कारवाया करणे हे याचे एकमेव उद्दिष्ट. तो मानवाधिकार, धार्मिक स्वातंत्र्य याचा आधार घेत खोट्या बातम्या पसरवत भारतात अशांतता निर्माण करीत असतो.
याशिवाय ICNA शी संलग्न मुस्लीम सेंटर ऑफ ग्रेटर प्रिन्स्टनचा (MCGP) एक प्रमुख मोहमद अस्लम हा राहुल गांधींच्या कार्यक्रमाचा समन्वयक आहे. हाच मोहमद अस्लम प्रतिबंधित स्टुडंट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) चा संस्थापक सदस्य आहे. हाच अस्लम SIMI वर बंदी आणताच अमेरिकेत पळून गेला. SIMI ही देशद्रोही संघटना. असे निश्चित करून काँग्रेस सरकारनेच यावर बंदी आणली होती. आपल्या कारवाया चालू ठेवण्यासाठी नव्या स्वरूपात सीमीचे इंडियन मुजाहिद्दीन असे नामकरण झाले. यांच्याद्वारे देशभरात अनेक बॉम्बस्फोट घडविण्यात आले. यावरही बंदी आल्यानंतर तिचे रूपांतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) मध्ये झाले. यांच्या देश विघातक कार्यामुळे अलीकडेच मोदी सरकारने यावर बंदी आणली. PFI चे मुख्य केंद्र हे केरळ राज्यात. याच राज्यातील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी खासदार आहेत. तेथे त्यांना PFI बरोबरच इंडियन मुस्लीम लीग (IML) यांचा पाठिंबा घ्यावा लागला होता. म्हणूनच एका प्रश्नाच्या उत्तरात राहुल गांधी यांना याच अमेरिका दौऱ्यात ‘इंडियन मुस्लीम लीग हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. या पक्षात गैरधर्मनिरपेक्ष असे काही नाही’ असे म्हणावे लागले. खरे तर मुस्लीम लीग हा स्वातंत्र्यपूर्व मोहम्मद अली जिन्हा यांचा पक्ष. या पक्षामुळेच भारताचे विभाजन झाले. राहुल गांधी जेव्हा जेव्हा भारताबाहेर जातात तेव्हा तेव्हा त्यांच्यात मोहम्मद अली जिन्हांचे भूत संचारते. आपल्या अलीकडील ब्रिटनच्या दौऱ्यातही राहुल गांधींनी भारतविरोधी वक्तव्य केली होती.
पाकिस्तान हे तर भिकारी राष्ट्र आहे. त्यांची गुप्तहेर संघटना आय.एस.आय. ही सुद्धा भिकारी. मग भारतविरोधी कारवायांसाठी यांच्याकडे पैसा येतो तरी कुठून? याचे उत्तर, चीनकडून. असे असूनही राहुल गांधी हे चीनचा उदो उदो करीत असतात. चीन अशा भारतविरोधी, दलाल, व्यक्ती, संस्था-संघटना, एनजीओ, देश यांना निधी पुरवतो. यांच्याचद्वारे आयोजित कार्यक्रमात राहुल गांधी म्हणतात, ‘मी पंतप्रधान झालो तर देशात मोहब्बत की दुकान खोलेन.’ अशाने आपण मोहब्बत की दुकान नव्हे; तर जिहादी, फुटीरतावादी, खलिस्तानी, देशद्रोही यांची दुकाने प्रस्थापित करून तिच्या भरभराटीची व्यवस्था करीत आहात. मामला सुरू झाला आहे. राहुल गांधी कोणकोणते गुल खिलायेंगे हे पाहावे लागेल. या प्रवृत्तीस वेळीच आवर घालणे उचित, देशभक्तांनो सावध राहा, जागरूक व्हा…!