Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीशेतकरी रस्त्यावर उतरल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

शेतकरी रस्त्यावर उतरल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

राज्यात निदर्शने आणि आंदोलने सुरु असताना आता शरद पवारांनी शेतक-यांना केले रस्त्यावर उतरण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर : राज्यकर्ते आणि त्यांचे सहकारीच रस्त्यावर येऊ लागले व त्यामुळे दोन गटांमध्ये कटुता निर्माण होत असेल तर, ही काही चांगली गोष्ट नाही. सकाळी टीव्हीवर पाहिले कोणीतरी औरंगजेबाचे छायाचित्र दाखविला. त्यावरून पुण्यात व अन्य ठिकाणी पडसाद उमटण्याचे कारण काय आहे? औरंगजेबाचे छायाचित्र दाखविले म्हणून काय परिणाम होतो, हे मला कळत नाही. पाणी, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आदी पायाभूत सुविधांवर राज्यकर्त्यांचे लक्ष असले पाहिजे. सध्या कांदा, कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांकडे पडून आहे. अशावेळी शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या मागे राहील, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आता शेतक-यांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले आहे.

कोल्हापूरला कुणीतरी मोबाईलवर पाठविलेला मेसेज चुकीचा असेलही, पण म्हणून लगेच रस्त्यावर उतरून धार्मिक स्वरूप देणे योग्य नाही. आज सत्ताधारी पक्ष अशा गोष्टींना प्रोत्साहित करतो. शांतता आणि सुव्यवस्था ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे, असे पवार म्हणाले.

येथे बुधवारी पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात (बीआरएस) कोण जाते, याचा आढावा घेतला. काहींच्या जाण्यावरून फारशी चिंता करण्याची गरज नाही. ‘केसीआर’ महाराष्ट्रात येणार असतील तर, येऊ देत. सबंध देश त्यांना मोकळा आहे, असेही पवार म्हणाले.

राज्यपाल रमेश बैस यांनी बाजीराव पेशवे यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर पवार म्हणाले, ‘पेशव्यांच्यासंबंधी आस्था असलेला वर्ग आजही आहे. मागचे राज्यपाल फारच बोलके होते, हे आताचे कसे आहेत, ते अजून स्पष्ट झालेले नाही.’ असा चिमटा पवार यांनी काढला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -