Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

तुळजाभवानीला भाविकांनी अर्पण केलेल्या सोने-चांदीची मोजमाप सुरू; अंदाजे २०० किलो सोने तर ४ हजार किलो चांदी

तुळजाभवानीला भाविकांनी अर्पण केलेल्या सोने-चांदीची मोजमाप सुरू; अंदाजे २०० किलो सोने तर ४ हजार किलो चांदी

आरबीआयकडून वितळून दिले जाणार सोने

तुळजापूर : दरवर्षी लाखो पर्यटक धार्मिक स्थळांना भेटी देत असतात. त्यात तुळजापूर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. देश-विदेशातून भाविक तुळजाभवानीच्या दर्शनासाठी मंदिराला भेट देतात. देवीवरची श्रद्धा म्हणून भाविक आपापल्या परीने देवीला देणगी देखील देतात. यंदा १० वर्षांनंतर प्रथमच या देणगीचे मोजमाप केले जात आहे. आतापर्यंत अंदाजे २०० किलो सोने तर ४ हजार किलो चांदी जमा झाल्याचे बोलले जात आहे. हे सोने आरबीआयकडून वितळून दिले जाणार आहे.

रोज सकाळी १० सायंकाळी ६ वेळेत ही मोजमाप केली जाणार आहे. यात कोणत्याही प्रकारे लबाडी किंवा गैरवर्तन होऊ नये यासाठी पुरेपूर खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिराच्या दर्शन मंडपातील चौथ्या मजल्यावरील हॉलमध्ये कडक सुरक्षेत हे काम सुरू करण्यात आलं आहे. सोने मोजदाद प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि सीसीटीव्ही कॅमेराच्या निगराणीत करण्यात येत आहे. या सोने मोजदादसाठी शासकीय परवाना धारक मुंबईचे सिध्दीविनायक मंदिराचे सोने मोजदाद करणारे पुरुषोत्तम काळे खास उपस्थितीत होते. या प्रक्रियेदरम्यान मोजदाद करणाऱ्या मंडळीना खास वेश वापरण्यास दिला होता, ज्यात टी शर्ट, पँटला एकही खिसा नव्हता.

Comments
Add Comment