
बाल्कनी तर रिकामीच शिवाय सभागृहातही अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकामी
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये आज ठाकरे गटाने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला मंचावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाचे महत्त्वाचे नेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे उपस्थित होते. तरीही या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा थंड प्रतिसाद दिसून आला.
मेळावा आयोजित केलेल्या सभागृहाची बाल्कनी तर पूर्णपणे रिकामीच होती, मात्र मुख्य सभागृहातही अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकामी असल्याचे समजत आहे. शिवाय जे कार्यकर्ते उपस्थित आहेत, त्यांच्याकडूनही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समजत आहे.