Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडी२०२४ साठी भाजपने 'या' नेत्यांवर सोपवली मतदारसंघांची जबाबदारी

२०२४ साठी भाजपने ‘या’ नेत्यांवर सोपवली मतदारसंघांची जबाबदारी

मुंबई : लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता संघटनेमध्ये काही बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गत अनेक राज्यांमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाऊ शकतात. तसेच, स्थानिक पातळ्यांवरही बदल केले जातील. असे वर्तवले जात असताना मतदार संघांचे निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. तसेच, महाराष्ट्रातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांच्या नियुक्त्या केल्या.

विनय सहस्त्रबुद्धे यांना ठाणे, मुरलीधर मोहोळ यांना पुणे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी सुमित वानखेडे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही यादी जाहीर केली आहे.

पुण्यातील तीन लोकसभा मतदारसंघावर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रमुख म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी पुन्हा राहुल कुल यांच्याकडे दिली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी महेश लांडगे यांच्यांकडे दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी शनिवारी एक बैठक पार पडली. या बैठकीत खासदार आणि आमदारांचा देखील समावेश होता. या बैठकीमध्ये निवडणूक प्रमुखांकडे त्या त्या मतदारसंघानुसार जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -