भाईंदर (प्रतिनिधी): मीरा रोडच्या गीता नगर भागातील एका फ्लॅट मध्ये ३२ वर्षीय महिलेचा खून करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याची घटना घडली आहे.
मीरा रोडच्या गीता नगर फेज ७ मधील जे -६, आकाशदिप इमारतीच्या ७ व्या मजल्यावर मनोज सहाने (वय ५२) आणि सरस्वती (वय ३२) नावाचे दोघेजण लिव्ह अँड रिलेशन पद्धतीने राहत होते. त्याच्या घरातून दोन दिवसांपासून दुर्गंधी येत होती, बुधवारी संध्याकाळ पासून असह्य दुर्गंधी पसरली त्यामुळे शेजाऱ्यांनी नयानगर पोलिसांना माहिती दिली. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी दरवाजा तोडून प्रवेश केला असता एका महिलेचा तुकडे केलेला मृतदेह आढळला आहे. मृतदेहाचे काही तुकडे फेकले गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.