Friday, March 21, 2025
Homeमहत्वाची बातमीमेट्रो स्थानकांवर होणार वाऱ्याची दिशा नोंद

मेट्रो स्थानकांवर होणार वाऱ्याची दिशा नोंद

मेट्रो २अ आणि ७ च्या १० स्थानकांवर ॲनिमोमीटर यंत्र

मुंबई (प्रतिनिधी): मान्सून काळात वाऱ्याच्या स्थितीचे बारकाईने निरीक्षण करून मेट्रोची सेवा विनाव्यत्यत कार्यान्वित ठेवण्यासाठी मेट्रो मार्ग २अ आणि ७ च्या प्रत्येकी ५ अशा एकूण १० स्थानकांवर वाऱ्याची गती व दिशा यांची नोंद करणारे ॲनिमोमीटर यंत्र बसविण्यात आले आहे. या यंत्राच्या साहाय्याने वाऱ्याच्या वेगाचा अंदाज घेतला जाणार असून मान्सून काळात वाऱ्याच्या स्थितीचे बारकाईने निरीक्षण करून मेट्रोची सेवा सुरळीत ठेवण्याचा निर्णय मेट्रो प्रशासन घेणार आहे.

मान्सून काळात मेट्रो प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी महा मुंबई मेट्रोने महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार पावसाळ्यात वाऱ्याची गती व दिशा यांची नोंद करणारे ॲनिमोमीटर यंत्र मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गावर बसविण्यात आले आहेत. यामुळे मुंबई मेट्रोला वाऱ्याच्या स्थितीचे बारकाईने निरीक्षण करून मेट्रोची सेवा विनाव्यत्यत सुरू ठेवणे मेट्रो प्रशासनाला शक्य होणार आहे. यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी

मेट्रो स्थानकांवर सुमारे १९०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज ठेवण्यात आले आहेत. महा मुंबई मेट्रोने प्रत्येक मेट्रो स्थानकांवर किमान ६४ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. यामध्ये प्लॅटफॉर्म, रस्त्यालगत असलेला भाग याचा समावेश आहे. या कॅमेरांचे मॉनिटरिंग २४ तास कार्यान्वयन नियंत्रण केंद्र आणि सुरक्षा नियंत्रण कक्षाद्वारे केले जाणार आहेत. यामुळे आपत्कालीन परिस्थितीचे निरसण करणे सोईचे होणार आहे.

यासोबतच प्रवाशांच्या तत्पर सेवेसाठी मान्सून कंट्रोल रूम स्थापित केले आहेत. चारकोप मेट्रो डेपोमध्ये २४ तास कार्यरत असणारे मान्सून कंट्रोल रूम स्थापित करण्यात आली आहे. प्रवाशांना तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे कंट्रोल रूम कार्यरत राहणार असून प्रशिक्षित कर्मचारी २४ तास इथे कार्यरत असतील. जे हवामानामुळे उद्भवणारी अनपेक्षित परिस्थिती तसेच प्रवास दरम्यानचा व्यत्यय तत्काळ सोडवण्यास मदत करतील. आपत्कालीन परिस्थितीत कंट्रोल रूमशी संपर्क साधण्यासाठी 1800 889 0505 / 1800 889 0808 या टोल फ्री क्रमांकाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ समन्वय साधण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन, बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन केंद्र (BMC), पोलिस नियंत्रण कक्ष, रुग्णवाहिका सेवा आणि अग्निशमन दलासोबत मुंबई मेट्रोच्या मान्सून कंट्रोल रूमचा हॉटलाइन क्रमांक थेट जोडलेला आहे. ज्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत उपरोक्त संस्थांसोबत तत्काळ समन्वय साधून समस्येचे तत्काळ निरसन करणार आहे.

मान्सून कंट्रोल रूम ही आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज

महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी महामुंबई मेट्रो प्रवाशांना विना व्यत्यय तसेच सुरक्षित प्रवास सुविधा पुरविण्यासाठी कटीबद्ध आहे. मान्सून कंट्रोल रूम ही आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आहे. ही टीम मान्सून दरम्यान वातावरणीय बदल आणि मेट्रो ची सेवा यांचे निरीक्षण करून नागरिकांचा प्रवास विनव्यत्यय आणि सुरक्षितता निश्चित करण्याची जबाबदारी पार पडतील. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाश्यांना त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत पोहचण्यास विलंब होणार नाही याची खबरदारी म्हणून इतर सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेमध्ये व्यत्यय आल्यास महा मुंबई मेट्रो कडून गरजेनुसार अतिरिक्त मेट्रो सेवा चालवण्याची तयारी करण्यात आलेली आहे. प्रवाशांना एक विश्वासार्ह आणि कार्यक्षम वाहतूक सुविधा प्रदान करणे हे महा मुंबई मेट्रोचे उद्दिष्ट आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -