Tuesday, July 23, 2024
Homeक्राईमदोघांच्या संशयास्पद मृत्यूने मुंबई हादरली!

दोघांच्या संशयास्पद मृत्यूने मुंबई हादरली!

मरीन ड्राईव्हजवळच्या वसतीगृहात १९ वर्षीय विद्यार्थीनीची बलात्कार करून हत्या,

तर संशयिताची रेल्वेखाली आत्महत्या!

मुंबई : चर्चगेट परिसरातील मरीन ड्राईव्हजवळच्या सावित्रीबाई फुले वसतीगृहातील एका १९ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुपारी मुलीची हत्या आणि रात्री या हत्येतील संशयित आणि बेपत्ता असलेल्या वॉचमनचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे बोलले जात असून याचा संशय वसतीगृहाच्या वॉचमनवर होता. मात्र सकाळपासून बेपत्ता असलेल्या वॉचमनचा मृतदेह चर्नी रोड पोलीस स्टेशनच्या जवळ असलेल्या रेल्वे ट्रॅकवर आढळल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम तपासत आहेत. ओमप्रकाश कनौजिया (५३) असे संशयित वॉचमनचे नाव आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -