मणिपूरमध्ये हिसांचाराचा कहर! आई आणि चिमुकल्याला जिवंत जाळले

उपचारासाठी रुग्णवाहिकेतून जात असताना रुग्णवाहिका पेटवून दिली


इंफाळ: मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये हिंसक जमावाने तीन जणांना जिवंत जाळले. यामध्ये आई आणि मुलाचाही समावेश आहे. तिघेही रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जात होते. वाटेत २ हजार लोकांच्या जमावाने हल्ला करून गाडी पेटवून दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीनंतर राखेतून फक्त हाडेच आढळून आली आहेत.


ही घटना रविवारी घडली असली तरी त्याची संपूर्ण माहिती दोन दिवसांनी समोर आली आहे. टोन्सिंग हँगिंग (७ वर्ष), त्याची आई मीना हँगिंग आणि त्याची नातेवाईक लिडिया लॉरेम्बम अशी मृतांची नावे आहेत.


या तिघांनी ३ मे पासून इंफाळच्या पश्चिमेला सुमारे १५ किमी अंतरावर असलेल्या कांगचुप येथील आसाम रायफल्सच्या छावणीत आश्रय घेतला होता. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आसाम रायफल्सच्या कॅम्पमध्ये अनेक कुकी कुटुंबे राहत आहेत. अधूनमधून बाहेरून गोळीबार होत असून मेईतेई समुदायातील लोक कुकी राहत असलेल्या भागांना लक्ष्य करतात. रविवारी अशाच एका हल्ल्यात एका मुलासह तीन जण जखमी झाले.


यानंतर शिबिराच्या अधिकाऱ्यांनी इंफाळ पश्चिमचे एसपी इबोमचा सिंग यांच्याशी संपर्क साधला आणि पीडितांना इंफाळ रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. सायंकाळी ५.१६ वाजता रुग्णवाहिका आणि परिचारिका एसपींच्या देखरेखीखाली शिबिरातून निघाली. आसाम रायफल्सचे कोणीही त्यांच्यासोबत नव्हते.



एसपींसमोरच रुग्णवाहिका पेटवून देण्यात आली


रुग्णवाहिका नुकतीच अर्ध्या वाटेवर पोहोचली होती, तेव्हा हिंसक जमावाने वाहनाला धडक दिली. आसाम रायफल्सच्या सूत्रांनी सांगितले की त्यांना रविवारी संध्याकाळी नंतर कळले की एसपींच्याच समोर ती रुग्णवाहिका जाळण्यात आली. चालक आणि परिचारिका घटनास्थळावरून पळून गेले.


या आगीत मृत्युमुखी पडलेली आई मेईतेई समाजातील असून तिचे लग्न कुकी समाजातील व्यक्तीशी झाले होते. मृताचे नातेवाईक पावलेनलाल हँगिंग म्हणाले, आम्ही ३ मे पासून मेईतेई समुदायाकडून अत्याचाराला सामोरे जात आहोत. पण रविवारची घटना सर्वात भीषण होती.

Comments
Add Comment

आता बोला? एकाच घरात ४,२७१ मतदार!

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात त्रिस्तरीय पंचायत निवडणुकीच्या मतदार यादीत मोठी अनियमितता समोर

राहुल गांधींचा 'मतदारचोरी'चा आरोप निवडणूक आयोगाने फेटाळला; 'ऑनलाइन' मतदान वगळणे शक्य नाही

नवी दिल्ली: कर्नाटकच्या आळंद मतदारसंघातून मोठ्या प्रमाणात मतदार वगळल्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा

काँग्रेस समर्थकांची नावं मतदारयादीतून गायब केली जातात, राहुल गांधींचा नवा आरोप

नवी दिल्ली : लोकसभेच्या तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतांची चोरी करण्यात आल्याचा आरोप राहुल

आता 'ईव्हीएम' मतपत्रिकेवर उमेदवारांचे रंगीत फोटो; बिहारमधून सुरुवात

नवी दिल्ली: निवडणुकीदरम्यान मतदारांना स्पष्टता मिळावी आणि गोंधळ कमी व्हावा या उद्देशाने 'भारतीय निवडणूक

'राहुल गांधींनी काढली घुसखोर वाचवा यात्रा'

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजधानी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात

लिओनेल मेस्सीने पंतप्रधान मोदींना पाठवली वाढदिवसाची 'ही' खास भेट

नवी दिल्ली: आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशभर ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. वेगवेगळ्या