एक ठार, २३ जखमी
जत : गुहागर-विजयपूर महामार्गावरील जत तालुक्यातील मुचंडी येथे ट्रकने एसटी बसला मागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एक प्रवासी ठार झाला, तर २३ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी १३ जण गंभीर जखमी आहेत. जखमींना उपचारासाठी जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आगाराची सांगोला-विजयपूर बस ही विजयपूरला निघाली होती, तर साईराज ट्रान्सपोर्टचा ट्रक हा साखर भरून विजयपूरला निघाला होता.
सांगोला- विजयपूर बस कर्नाटक सीमेलगतच्या बसथांब्यावर प्रवासी उतरत होते. याठिकाणी तीव्र उतार आहे. याठिकाणी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकने पाठीमागून एसटीला जोरात धडक दिली.