भात १४३, ज्वारी २३५ तर मूग आणि तिळाच्या हमीभावात ८०० रुपयांची वाढ जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) : केंद्र सरकारने खरीप पिकांच्या किमान हमीभाव किमतीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामध्ये भाताच्या किमान हमीभावामध्ये १४३ रुपयांची वाढ केली आहे, तर ज्वारीच्या किमान हमीभावामध्ये २१०रुपयांची वाढ करण्यात आली आहे. भात पिकाच्या किमान हमीभावामध्ये वाढ होऊन आता ती २१८३ रुपये करण्यात आली आहे, तर ज्वारीचा किमान हमीभाव आता २३५ वर पोहोचला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी आशा केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिह तोमर यांनी व्यक्त केली.
देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे तसेच जास्तीत जास्त प्रदेश कृषी पिकाखाली यावा यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय अन्न आणि ग्राहक मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले की, कृषी खर्च आणि किमती आयोगाकडून वेळोवेळी येणाऱ्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी खरीप पिकांसाठी सर्वाधिक किमान हमीभाव जाहीर करण्यात आला आहे आणि त्याचा फायदा देशातील शेतकऱ्यांना होणार आहे.
कोणत्या पिकांना किती हमीभाव?
भात – २१८३रुपये – १४३ रुपयांची वाढ
ज्वारी – ३१८० रुपये – १४३ रुपयांची वाढ
ज्वारी मालदांडी – ३२२५ रुपये – २३५ रुपयांची वाढ
रागी – ३८४६- २६८ रुपयांची वाढ
तूर – ७००० रुपये – ४०० रुपयांची वाढ
सोयाबीन – ४६०० रुपये – ३०० रुपयांची वाढ
मूग – ८५५८ रुपये – ८०३ रुपयांची वाढ
तिळ – ८६३५ रुपये – ८०५ रुपयांची वाढ